शालार्थ आयडीप्रकरणी शासनस्तरावर चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:16 AM2021-03-14T04:16:14+5:302021-03-14T04:16:14+5:30
जळगाव : जिल्ह्यातील काही शिक्षण संस्थांमध्ये शालार्थ क्रमांक देताना अनियमिता असल्याची तक्रारीची सध्या शासनस्तरावर चौकशी सुरू करण्याची माहिती शिक्षण ...
जळगाव : जिल्ह्यातील काही शिक्षण संस्थांमध्ये शालार्थ क्रमांक देताना अनियमिता असल्याची तक्रारीची सध्या शासनस्तरावर चौकशी सुरू करण्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
गेल्या एक ते दोन वर्षांपूर्वी आमदार किशोर पाटील यांनी विधीमंडळात जळगाव जिल्ह्यातील सात शिक्षण संस्थांमध्ये शालार्थ क्रमांक देताना अनियमितता असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर हा प्रश्न विधी मंडळात चांगलाच गाजला होता. नंतर या प्रकरणाची चौकशीला सुरुवात झाली होती. तत्कालीन उपसंचालक नितीन बच्छाव यांनी जळगाव जिल्ह्यातून येऊन दप्तर तपासणी केली होती. त्यानंतर तपासणी अहवाल हा शासनाकडे सादर केला होता. दरम्यान, बनावट शालार्थ क्रमांकप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये गुन्हेही दाखल आहेत. तसेच शालार्थ क्रमांक देताना अनियमितता असल्याचा प्रश्न चांगलाच गाजल्यानंतर राज्यातील सर्व शालार्थ क्रंमाकांची चौकशी करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी शासनाने घेतला होता. सध्या या प्रकरणाची शासनस्तरावर चौकशी सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.