अजिंठा लेणीच्या द्धिशतक पूर्तीकडे शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:23 AM2021-02-23T04:23:31+5:302021-02-23T04:23:31+5:30

या द्विशतक पूर्तीचा उत्सव कोठेही आज कोठेही साजरा नसतांना, याची खंत जाणवत आहे. असे मत चोपडा येथील ललित कला ...

Government neglects to fulfill the bicentenary of Ajanta Caves | अजिंठा लेणीच्या द्धिशतक पूर्तीकडे शासनाचे दुर्लक्ष

अजिंठा लेणीच्या द्धिशतक पूर्तीकडे शासनाचे दुर्लक्ष

Next

या द्विशतक पूर्तीचा उत्सव कोठेही आज कोठेही साजरा नसतांना, याची खंत जाणवत आहे. असे मत चोपडा येथील ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राजू महाजन यांनी व्यक्त केले. परिवर्तनच्या दशकपूर्ती निमित्ताने खान्देशातील चित्रकारांनी समर्पित केलेल्या शोध प्रदर्शनात रविवारी 'अजिंठ्यातील चित्रकला : इतिहास आणि वास्तव' याविषयावर प्राचार्य राजू महाजन यांचे व्याख्यान झाले. पु. ना. गाडगीळ आर्ट गॅलरीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला राज शिंगे, परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, नारायण बाविस्कर, चित्रकार राजू बाविस्कर, विजय जैन, विकास मलारा, शाम कुमावत, सुशील चौधरी, निरंजन शेलार, यशवंत गरूड, नितीन सोनवणे उपस्थित होते. हे शोध प्रदर्शन २८ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार असून, रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: Government neglects to fulfill the bicentenary of Ajanta Caves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.