टॅक्सी चालक-मालकांना शासनाने मदत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 03:54 PM2020-04-01T15:54:46+5:302020-04-01T15:55:58+5:30
लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी टॅक्सी चालक-मालकांनी केली आहे.
पारोळा, जि.जळगाव : लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी टॅक्सी चालक-मालकांनी केली आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर झाले आहे. सदरचा निर्णय हा अतिशय स्तुत्य आहे. याला लॉकडाउनला आमचा पाठिंबा आहे. जिल्ह्यातील संपूर्ण रिक्षा-टॅक्सी सेवा पूर्णपणे बंद आहे. प्रश्न एक-दोन दिवसांचा असता तर ठीक होते. मात्र सलग २५ दिवस रिक्षा-टॅक्सी बंद राहणार आहे. त्या अनुषंगाने आमच्या टॅक्सी मालक-चालकांचे पोट हातावर आहे. गाडीचे चाक फिरले तरच संध्याकाळी काहींची चुल पेटतील. अशी हलाकीची परिस्थिती उद्भवलेली आहे. शासनाने आम्हाला आर्थिक मदत करावी,असे निवेदन जिल्हाधिकारी व तहसीलदारांमार्फत देण्यात आले आहे.
या वेळी टॅक्सी-रिक्षा चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर धोंडू कासार, उपाध्यक्ष रमेश पाटील, अण्णा पाटील, सुधाकर मोहन कासार उपस्थित होते.