एरंडोलला शासकीय ट्रॉमा सेंटर उभारण्यात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 02:30 PM2020-11-22T14:30:22+5:302020-11-22T14:31:44+5:30

एरंडोल येथे शासकीय ट्रॉमा सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी एरंडोल शहर सर्व पक्षीय समितीने केली आहे.

A government trauma center should be set up at Erandol | एरंडोलला शासकीय ट्रॉमा सेंटर उभारण्यात यावे

एरंडोलला शासकीय ट्रॉमा सेंटर उभारण्यात यावे

Next
ठळक मुद्दे एरंडोल शहर सर्व पक्षीय समितीची पालकमंत्री यांच्याकडे मागणीमहामार्गावर अपघाताचे प्रमाण जास्त

एरंडोल : येथे शासकीय ट्रॉमा सेंटर उभारण्यात यावे, अशी मागणी एरंडोल शहर सर्व पक्षीय समितीने केली आहे. समितीने यााबाबतचे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिले.
एरंडोल शहर हे राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे. महामार्गावर अपघाताचे प्रमाण जास्त आहे. त्यात अत्यवस्थ रुग्णावर उपचार करण्यासाठी सद्य:स्थितीत एरंडोल ग्रामीण रुग्णालयात असुविधा आहे. शहरात जर ट्रॉमा सेंटर उभारण्यात आले तर सद्य:स्थितीत असलेली प्रशिक्षित व तज्ञ डॉक्टरांची, साधनसामुग्री, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेविका, रुग्णवाहिका यांची कमतरता दूर होणार आहे. नुकतीच जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ते अपघाताबाबत शहरालगत वाढत असलेल्या घटनांबद्दल व त्यात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहग? तातडीच्या उपचारासाठी आरोग्य यंत्रणेस ट्रॉमा सेंटर उभारणीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिल्याने जामनेर,चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत असल्याने एरंडोल येथे ट्रॉमा सेंटर उभारण्याकामी आरोग्य यंत्रणेला आदेश द्यावे, अशी विनंती केली आहे.
निवेदनावर नगराध्यक्ष रमेश परदेशी, शिवसेना उपजिल्हा संघटक किशोर निंबाळकर, एरंडोल तालुका मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुधीर काबरा, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष विजय महाजन, तालुका उपसंघटक शिवसेना राजू राठोड, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, नगरसेवक डॉ.नरेंद्र ठाकूर, मनसे तालुकाध्यक्ष विशाल सोनार, नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक एस.के.चौधरी आदींच्या सह्या आहेत.

Web Title: A government trauma center should be set up at Erandol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.