वाकडी येथील पीडितांच्या मदतीसाठी शासन प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:46 AM2018-07-03T01:46:03+5:302018-07-03T01:46:14+5:30

गृहराज्यमंत्री केसरकर : धुळ्यातीली घटना दुर्दैवी

The government will try to help the victims of Wakadi | वाकडी येथील पीडितांच्या मदतीसाठी शासन प्रयत्नशील

वाकडी येथील पीडितांच्या मदतीसाठी शासन प्रयत्नशील

Next


जामनेर, जि.जळगाव : वाकडी येथील अल्पवयीन मुलांना झालेली मारहाणीची घटना चुकीचीच आहे. पीडित मुलांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत तातडीने मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन गृृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी वाकडी, ता.जामनेर येथे दिले.
गेल्या १० जूनला वाकडी येथे मातंग समाजातील ३ मुलांना अमानुष मारहाणीची घटना घडली होती. घटनेतील पीडित कुटुंबीयांंची केसरकर यांनी भेट घेतली. पीडितांना सामाजिक न्याय विभागाकडून मदत जाहीर झाली असून, पीडितांना घरकुल मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धुळे येथे पाच जणांची जमावाने केलेल्या निर्घृण हत्येबाबत ते म्हणाले, घटना दुर्दैवी आहे. अफवेमुळे हा प्रकार घडला असून, नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामिण भागातील यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला जाईल.
सेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉ.मनोहर पाटील, अ‍ॅड.प्रकाश पाटील, अ‍ॅड.भरत पवार, सुधाकर सराफ यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. रेशन कार्ड मिळाले नसल्याची तक्रार पीडितांनी केली असता, त्यांनी महसूल विभागास याबाबत सूचना दिली.

Web Title: The government will try to help the victims of Wakadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.