गिरणा नदीवर 7 बलून बंधारे तयार करण्यास राज्यपालांची मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 05:36 PM2017-08-24T17:36:42+5:302017-08-24T17:41:15+5:30
जळगाव जिल्ह्यातील चार तालुक्यातील 4,432 हेक्टरला लाभ
ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव,दि.24 - गिरणा नदीवर मेहुणबारे, बहाळ, पथराड, मळगाव, परधाडे, कुरंगी आणि कानळदा या 7 बलून बंधा:यांच्या प्रस्तावाला 23 रोजी झालेल्या बैठकीत राज्यपालांनी हिरवा कंदीला दिला आहे. बैठकीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत चाळीगावचे आमदार उन्मेश पाटील उपस्थित होते.
बलून बंधा:यासाठी जलसंपदा विभागाने प्रस्ताव दाखल केला होता. यास मुख्यमंत्र्यांनीही मंजुरी दिल्यावर तो राज्यपालांकडे पाठविण्यात आला. 23 रोजी जलसंपदामंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेवून बंधा:यांबाबत माहिती दिली. याच बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली.
7 बलून बंधा:यांमुळे 21.49 दलघमी पाणीसाठा होणार आहे. त्याचा फायदा चार तालुक्यातील 4,432 हेक्टर इतक्या क्षेत्राला होईल. यासाठी 711 कोटी रुपये खर्च प्रस्तावित केला आहे. केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी देखील गिरणेवरील बलून बंधारे बांधण्यासाठी हवाई पाहणी केली होती.