पाच जागा न मिळाल्यास सामूहिक राजीनामे देणार : जळगावात कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:26 PM2019-09-19T12:26:46+5:302019-09-19T12:27:10+5:30
तातडीच्या बैठकीत निर्णय
जळगाव -जिल्ह्यात कॉंग्रेसला ११ पैकी केवळ दोनच जागा मिळत असल्याने जिल्हा कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेश कॉँग्रेसकडे तीव्र संताप व्यक्त केला. कॉँग्रेसला जर ५ जागा मिळाल्या नाहीत तर सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय जिल्हा पदाधिकाºयांनी घेतला असल्याची माहिती कॉँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
बुधवारी कॉँग्रेस भवनात जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, प्रदेश सरचिटणीस अॅड.ललिता पाटील, शहर जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, माजी महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, अॅड.सलीम पटेल, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भालेराव उपस्थित होते. सर्वच पदाधिकाºयांनी प्रदेश कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांच्या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात कॉँग्रेस नेहमीच पाच ते सहा जागा लढवित आली आहे. मात्र, या निवडणुकीत जर जिल्ह्यातील ११ पैकी केवळ २ जागा दिल्या जात असतील तर आम्ही केवळ बैठकीतच यायचे का ? असा प्रश्न अनेक पदाधिकाºयांनी उपस्थित केला.
यावर पक्षाचे उत्तर महाराष्टÑ प्रभारी वामशी रेड्डी यांना मोबाईलवरून संदेश पाठविण्यात आला आल्याची माहिती मिळाली.
उत्तर महाराष्टÑ प्रभारींना पाठविला संदेश
या बैठकीत सर्वच पदाधिकाºयांकडून तीव्र भावना व्यक्त होत असल्याने, जिल्हाध्यक्षांनी कॉँग्रेसचे उत्तर महाराष्टÑ प्रभारी वामशी रेड्डी यांना मोबाईलवरून संदेश पाठविला. या संदेशात कॉँग्रेस पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त करत जिल्ह्यात पक्षाला पाच जागा मिळाव्यात अशी मागणी केली. त्यावर रेड्डी यांनी तत्काळ उत्तर देत आपल्या भावना प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहचविण्याचा सूचना दिल्या.
मुक्ताईनगर, जळगाव ग्रामीण व अमळेरसाठी कॉँग्रेस आग्रही
जिल्ह्यात सध्या जळगाव शहर व रावेर या दोनच जागा लढविण्याबाबतची प्राथमिक माहिती जिल्हा पदाधिकाºयांना मिळाली होती. मात्र, जिल्ह्यात सध्यस्थितीत राष्टÑवादीची ताकद कमी असल्यामुळे कॉँग्रेसला जास्त मिळाव्यात अशी मागणी काही पदाधिकाºयांनी या बैठकीत केली. याबाबत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुक्ताईनगरसाठी कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जळगाव ग्रामीणमध्ये डी.जी.पाटील व अमळनेरमधून अॅड.ललिता पाटील यांनी आपण इच्छूक असल्याने या जागा देखील सोडण्यात याव्यात, केवळ २ जागा मिळाल्या तर सर्वांनी राजीनामा देण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेतला.
सामूहिक राजीनामे देण्याचा कोणताही निर्णय बैठकीत घेण्यात आला नाही. जिल्ह्यात राष्टÑवादीची कमी झालेली ताकद पाहता कॉँग्रेसला जिल्ह्यात काही जागा वाढवून मिळाव्यात अशी मागणी काही पदाधिकाºयांनी केली आहे. ही माहिती प्रदेशाध्यक्षांना देण्यात येईल.
-अॅड.संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस.