भुसावळात २७ पासून गोवर व रुबेला लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 03:42 PM2018-11-16T15:42:16+5:302018-11-16T15:43:00+5:30

भुसावळ येथील पालिकेच्या दवाखानाच्या अंतर्गत शाळाबाह्य मुलांना गोवर आणि रूबेला लसीकरण मिळावे याकरिता रेल्वे हॉस्पिटलसह सात केंद्रावर लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.

Gowar and Rubella vaccination campaign in the past 27 years | भुसावळात २७ पासून गोवर व रुबेला लसीकरण मोहीम

भुसावळात २७ पासून गोवर व रुबेला लसीकरण मोहीम

Next
ठळक मुद्देरेल्वे रुग्णालयात गोवर व रूबेला लसीकरणाबद्दल मार्गदर्शनसात केंद्रावर २७ पासून सकाळी ९ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान करणार लसीकरणसर्व शाळाबाह्य मुलांनाही लसीकरण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट


भुसावळ, जि.जळगाव : येथील पालिकेच्या दवाखानाच्या अंतर्गत शाळाबाह्य मुलांना गोवर आणि रूबेला लसीकरण मिळावे याकरिता रेल्वे हॉस्पिटलसह सात केंद्रावर लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. रेल्वे रुग्णालयात नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांनी याविषयी रेल्वे रुग्णालयात मार्गदर्शन केले.
याप्रसंगी रेल्वेचे सहाय्यक मंडळ चिकित्सा अधिकारी डॉ.दत्ता जाधव, अपर मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ.श्रवणकुमार, मुख्य कार्यालय अधीक्षक जितेंद्र जगताप, सहाय्यक नर्सिंग अधिकारी कमल अत्राम, सुनीता केकाल व नर्सिंग स्टाफ उपस्थित होता.
नऊ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना शासनातर्फे मोफत रूबेला- गोवर लसीकरण देण्यात येणार आहे. ही मोहीम २७ नोव्हेंबरपासून पुढे पाच आठवडे चालणार आहे. प्रत्येक शाळांमध्ये मुलांना लसीकरण करण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुलांसाठी शहरातील खडका रोड आरोग्य केंद्र्र, बद्री प्लॉट प्राथमिक आरोग्य केंद्र्र, दीनदयालनगर, आरोग्य केंद्र्र, महात्मा फुलेनगर, आयुर्वेद रुग्णालय, नगरपालिका दवाखाना, रेल्वे हॉस्पिटल, आॅर्डनस फॅक्टरी दवाखाना या केंद्रावर २७ नोव्हेंबरपासून सकाळी ९ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.फलटणकर यांनी दिली.





 

Web Title: Gowar and Rubella vaccination campaign in the past 27 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.