जि.प. चे प्रमुख विभाग प्रभारींच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 02:04 PM2019-08-12T14:04:38+5:302019-08-12T14:05:42+5:30
बाहेरून अधिकारी येईनात : रिक्त जागांचा प्रश्न
जळगाव : राजकीय व प्रशासकीय संघर्षाची नवी ओळख होत असलेल्या जिल्हा परिषदेत गेल्या कित्येक महिन्यांपासून महत्त्वाच्या विभागांचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे़ बाहेरून अधिकारीच यायला तयार नसल्याने रिक्त जागांचा प्रश्न गंभीर बनला आहे़
जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून येवले यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे़ अनेक महिन्यांपासून हे पद रिक्त आहे़ शिक्षण विभागाचा गेल्या चार महिन्यांपासून डॉ़ डिगंबर देवांग यांच्याकडे प्रभारी पदभार आहे़ यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कॅफो गायकवाड हे पदभार सांभाळत आहे़ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती होऊनही ते पदभार घेण्यास तयार नसल्याने डॉ़ दिलीप पोटोडे हे गेल्या महिनाभरापासून प्रभारी म्हणूनच आरोग्य विभागाचा कारभार सांभाळत आहे़ महत्त्वाच्या विभागांना कायस्वरूपी अधिकारी नसल्याने अनेक महत्त्वाच्या कामांना अडचणी निर्माण होत आहे, शिवाय अधिकाºयांच्या बदल्या झाल्यानंतर प्रलंबित महत्त्वाचे काही निर्णय घेण्याास प्रभारी अधिकाºयांना विलंब तर होतोच शिवाय मोठ्या अडचणीतून पुन्हा नवीन निर्णय प्रक्रिया राबवावी लागत असल्याचे चित्र आहे़
पदभार सोडतात तत्काळ, घ्यायला मात्र कोणी तयार
जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ कमलापूरकर यांची रत्नागिरी येथे बदली झाली़ आठ दिवसात त्यांनी पदभार सोडला मात्र पंचवीस दिवस उलटले नवे जिल्हाधिकारी आलेले नाहीत़ डेप्युटी सीईओ राजन पाटील यांची नाशिक येथे बदली झाली त्यांनी दुसºयाच दिवशी पदभार सोडला़ डेप्युटी सीईओ भाऊसाहेब अकलाडे यांच्याजागेवर सिंधुदुर्ग येथील के़ बी़ रणदिवे यांची नियुक्ती झाली आहे, आठवडा उलटला मात्र ते आलेले नाहीत़ अतिरिक्त सीईओ संजय मस्कर यांचे पद डिसेंबरपर्यंततरी प्रभारी गायकवाड यांच्याकडेच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे़ दुसरीकडे शिक्षण विभागाला अधिकारी मिळत नाही़ या बाबीमुळे शासकीय कामकाजावर परिणाम जाणवणार असल्याचे बोलले जात आहे़