ग्रा.पं. ठरावाअभावी वर्डी शाळेची घंटा वाजलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:13 AM2021-07-16T04:13:13+5:302021-07-16T04:13:13+5:30

वर्डी, ता. चोपडा : ग्रामपंचायतीच्या ठरावाअभावी वर्डी येथील शाळेची घंटा वाजलीच नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना व्हायरसची बाधा ...

G.P. The Verdi school bell did not ring due to lack of resolution | ग्रा.पं. ठरावाअभावी वर्डी शाळेची घंटा वाजलीच नाही

ग्रा.पं. ठरावाअभावी वर्डी शाळेची घंटा वाजलीच नाही

Next

वर्डी, ता. चोपडा : ग्रामपंचायतीच्या ठरावाअभावी वर्डी येथील शाळेची घंटा वाजलीच नाही.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांना व्हायरसची बाधा होऊ नये म्हणून शासनाने मार्च २०२० पासून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सध्या व्हायरसची तीव्रता कमी झाली असताना शासनाने १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात आदेश पारित केले. शाळा सुरू करण्यासाठी मात्र ग्रामपंचायत प्रशासन सरपंच यांच्या ग्रामसभेचा ठराव तसेच नियुक्त समितीची शिफारशीची आवश्यकता होती. वर्डी येथील स्वातंत्र्य सैनिक श्यामराव गोविंदा पाटील विद्यालय सुरू करण्यासाठी सज्ज होते. शाळा प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली होती. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाच्या ग्रामसभेचा ठराव न भेटल्याने शाळेची घंटा वाजू शकली नाही. विद्यमान ग्रामसेवक दोन महिन्याच्या दीर्घ रजेवर असल्याचे समजते. विद्यार्थ्यांना शाळा सुरू होईल याची उत्कंठा लागलेली असताना दीर्घ कालावधीनंतर ऑफलाइन शिक्षण व मित्रांच्या भेटीगाठी तसेच शिक्षकांशी सुसंवाद साधता येईल याचा आनंद परमोच्च साधला असताना व ऑनलाइन शिक्षणापासून सुट्टी मिळणार होती. परंतु शाळा सुरू न झाल्याने पालकांचा, विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचा हिरमोड झाला.

150721\img-20210715-wa0110.jpg

शाळेची ची साफसफाई करताना पर्यवेक्षक मोहन चव्हाण व कर्मचारी

Web Title: G.P. The Verdi school bell did not ring due to lack of resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.