संत बाबा हरदासराम यांच्या कृपेने गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 02:00 PM2018-07-23T14:00:14+5:302018-07-23T14:02:49+5:30
जळगाव शहरातील गाळेधारकांचा प्रश्न महत्त्वाचा असून, संतबाबा हरदासराम यांच्या कृपेने हा प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लागेल, अशी ग्वाही माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी दिली.
जळगाव : शहरातील गाळेधारकांचा प्रश्न महत्त्वाचा असून, संतबाबा हरदासराम यांच्या कृपेने हा प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लागेल, अशी ग्वाही माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी दिली.
सुरेशदादा जैन यांनी रविवारी सिंधी कॉलनीतील सिंधी सेवा मंडळात शिवसेनेच्या उमेदवाराचे प्रचार नारळ फोडले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी हिरानंद मंधवाणी, अशोक मंधान, रमेश मताणी, विजय दारा, दयानंद विसराणी, नंदलाल कुकरेजा, हेमू भावनानी, कन्हैय्यालाल कुकरेजा, सुरेश वरियानी आदी उपस्थित होते.
भरपावसातही सुरेशदादा यांनी प्रचार रॅलींमध्ये सहभाग घेतला. प्रचार रॅलींमध्ये सुरेशदादा यांच्यासोबत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी आमदार आर.ओ. तात्या पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक जितेंद्र मुदंडा आदी उपस्थित होते. सुरेशदादा जैन यांनी महाबळ कॉलनी, खोटे नगर, सिंधी कॉलनी, शिवाजी नगर या भागात शिवसेना उमेदवारांसाठी प्रचार केला. सकाळी प्रभाग १६ मधून सिंधी सेवा मंडळामध्ये प्रचार नारळ फोडले, त्यानंतर प्रभाग १३ व ८ मधील उमेदवारांसाठी प्रचार केला. यावेळी नंदलाल कुकरेजा यांचा नातू व अपक्ष उमेदवाार राहुल कुकरेजा यांनी माघार घेत सेवामंडळात शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्याचे स्वागत करण्यात आले.