कृउबातील धान्य बाजार आज राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:13 AM2021-07-16T04:13:23+5:302021-07-16T04:13:23+5:30
जळगाव : केंद्र शासनाच्या कडधान्य आकास्मित स्टॉफ लिमीट लावण्याचा धोरणाविरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीमधी व्यापारी बांधवांनी शुक्रवारी एक ...
जळगाव : केंद्र शासनाच्या कडधान्य आकास्मित स्टॉफ लिमीट लावण्याचा धोरणाविरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीमधी व्यापारी बांधवांनी शुक्रवारी एक दिवसाचा बंद पुकारला आहे. त्यामुळे शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य बाजार बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे. त्यामुळे शुक्रवारी शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
त्या भिंतीच्या कामाची चौकशी करा
जळगाव - शहरातील रामदास कॉलनी भागातील नाल्याची संरक्षण भिंत महिनाभरातच कोसळली आहे. या निकृष्ठ कामाची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी केली आहे. याबाबत मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले आहे. महिनाभरातच एखादे काम कोसळणे म्हणजे कामाची गुणवत्ता फारच कमी दर्ज्याची असून याबाबत या कामांची देखील सर्वकष चौकशी करून संबधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
महावितरणच्या भोंगळ कारभाराने नागरिक त्रस्त
जळगाव - गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. कोणतेही वादळ किंवा पाऊस नसतान देखील महावितरकडून तब्बल आठ ते दहा तास वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आव्हाणे, फुपनगरी, वडनगरी भागात देखील दररोज वीज पुरवठा खंडीत केला जात आहे.
उडाण फाऊंडेशनतर्फे दिव्यांग बालकांनाआहाराचे वाटप
जळगाव- जिल्ह्यातील रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र, उडाण प्रारंभिक बाल विकास केंद्र जळगाव तसेच इनरव्हील क्लब बाय बॉम्बे बे व्ह्यू यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी या जागतिक महामारी विरुद्ध लढण्यासाठी कुपोषित तसेच दिव्यांग मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकस आहाराचे वाटप करण्यात आले. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व डॉ.अमृता मुंढे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले जिल्ह्यातील ५० कुपोषित, गरजू आणि दिव्यांग बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी महिनाभरासाठी प्रोटीन पावडर, खजूर व सकस आहाराचे वाटप करण्यात आले. इनरव्हील क्लब बॉम्बे बे व्ह्यूच्या अध्यक्षा अस्मिता झुनझुनवाला, रजनी बारासिया व श्यामा भोसले यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी उडाणच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, विनोद शिरसाळे, संदीप पाटील, धनराज कासट, चारू इंगळे, चेतन वाणी, तुषार भामरे, पवन शिरसाळे, जयश्री पटेल, चेतन कुमावत व नीता मिश्रा यांनी परिश्रम घेतले.