जळगाव बाजार समितीतून धान्याच्या गोण्या लांबविणा-याला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 03:14 PM2019-03-28T15:14:18+5:302019-03-28T15:19:17+5:30

कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील दुकानांच्या बाहेर ठेवलेले गहू, दादर व बाजरीच्या गोण्या दुचाकीवरुन लांबविण्याºया दोघांना सुरक्षा रक्षकांची रंगेहाथ पकडले. त्यात झटापटीत एक जण फरार झाला असून एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या संशयिताचे नाव विठ्ठल आत्माराम नेरकर (रा.दत्त नगर, रामेश्वर कॉलनी) असे आहे.

Grains from the Jalgaon Bazar Samiti were found to be long-distance | जळगाव बाजार समितीतून धान्याच्या गोण्या लांबविणा-याला पकडले

जळगाव बाजार समितीतून धान्याच्या गोण्या लांबविणा-याला पकडले

Next
ठळक मुद्दे  गुन्हा दाखल दुचाकीवरील एक जण फरार

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील दुकानांच्या बाहेर ठेवलेले गहू, दादर व बाजरीच्या गोण्या दुचाकीवरुन लांबविण्याºया दोघांना सुरक्षा रक्षकांची रंगेहाथ पकडले. त्यात झटापटीत एक जण फरार झाला असून एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या संशयिताचे नाव विठ्ठल आत्माराम नेरकर (रा.दत्त नगर, रामेश्वर कॉलनी) असे आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,  कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आशिष शंकर अग्रवाल (३२, रा.आयोध्या नगर, जळगाव) यांचे दोन दुकान आहेत. गहू, दादर व बाजरी विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. रात्री दुकान बंद करुन जाताना धान्याच्या गोण्या काही बाहेरच ठेवलेल्या असतात. त्यांच्या दुकानाबाहेरुन सतत गोण्या चोरी होत असल्याने अग्रवाल यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दोन जण दुचाकीवरुन गोण्या चोरुन नेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अग्रवाल यांनी सुरक्षा रक्षक विजय पितांबर सोनवणे व समाधान रमेश सोनवणे यांना आज रात्री बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या.
दुचाकीवर ठेवल्या ९ गोण्या
गुरुवारी पहाटे साडे चार वाजता दुचाकीवरुन (क्र.एम.एच.१९ ए.बी.१७७७) दोन जण आले. त्यांनी ६० किलो वजनाच्या दादरच्या चार, ३० किलो वजनाच्या बाजरीच्या चार व ५० किलो वजनाची गव्हाची एक अशा १४ हजार ६६० रुपये किमतीच्या गोण्या दुचाकीवर ठेवून पलायन करणार तितक्यात सुरक्षा रक्षक विजय सोनवणे यांनी दोघांना पकडले. त्यावेळी जोरदार झटापटी झाली. त्यात एक जण पळून गेला. दरम्यान, याप्रकरणी दोघांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार राजाराम पाटील करीत आहेत.

Web Title: Grains from the Jalgaon Bazar Samiti were found to be long-distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.