जळगावात कुठल्याही रेशन दुकानावर मिळेल धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 02:06 PM2018-06-05T14:06:09+5:302018-06-05T14:06:09+5:30
जिल्ह्यातही रेशन दुकान ग्राहकांना पोर्टेबिलीटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याने कुठल्याही ग्राहकाला जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील कुठल्याही रेशन दुकानावर आवश्यक माहिती देऊन रेशनचे धान्य खरेदी करता येणार आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.५ : जिल्ह्यातही रेशन दुकान ग्राहकांना पोर्टेबिलीटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याने कुठल्याही ग्राहकाला जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील कुठल्याही रेशन दुकानावर आवश्यक माहिती देऊन रेशनचे धान्य खरेदी करता येणार आहे.
मे २०१८ पासून जळगाव जिल्ह्यात आधार इनाबल्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम (एईपीडीएस) सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १९२८ पैकी १९२१ स्वस्त धान्य दुकानातील अंत्योदयच्या पात्र लाभार्थ्याच्या १ लाख ३७ हजार ५४३ शिधापत्रिकांपैकी १ लाख ३७ हजार १७४ शिधापत्रिकांची (९९.७३ टक्के) आधार जोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकाने आर.सी. नंबर व आधार नंबर दिल्यास त्याला जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील कुठल्याही रेशन दुकानावरून धान्य खरेदी करता येऊ शकेल. धान्य दुकानदारांना भरपूर कमिशन देण्यात येत असल्याने जास्त कमिशनसाठी जास्त धान्य विकणे हेच उद्दीष्ट राहील.
मे २०१८ पासून जळगाव जिल्ह्यात आधार इनाबल्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम (एईपीडीएस) सुरु करण्यात आली आहे. त्याच्या तपासणीसाठी ३१ मे रोजी १०० टक्के रेशन दुकानांची तपासणी करण्यात आली असून त्याबाबतचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
धान्य वितरणात जिल्ह्याची आघाडी
जळगाव जिल्ह्यात आधार इनाबल्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम (एईपीडीएस) सुरु करण्यात आल्यानंतर पहिल्याच्या महिन्यात (मे महिन्यात) या नवीन यंत्रणेच्या सहाय्याने धान्य वितरणात जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. राज्यात सर्वाधिक धान्य वितरण करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जळगावचा २० वा क्रमांक आहे. जिल्ह्यात ६७.८६ टक्के धान्य या नवीन यंत्रणेद्वारे वितरीत झाले आहे.