रोझोदा येथे ग्रामपंचायतीकडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:18 AM2021-09-26T04:18:19+5:302021-09-26T04:18:19+5:30

सावखेडा, ता. रावेर : रोझोदा येथे अपघातांचे वाढते प्रमाण पाहता, महामार्गावर त्वरित गतिरोधक बसविण्याची मागणी सावदा येथील सामाजिक बांधकाम ...

From the Gram Panchayat at Rozoda | रोझोदा येथे ग्रामपंचायतीकडून

रोझोदा येथे ग्रामपंचायतीकडून

Next

सावखेडा, ता. रावेर : रोझोदा येथे अपघातांचे वाढते प्रमाण पाहता, महामार्गावर त्वरित गतिरोधक बसविण्याची मागणी सावदा येथील सामाजिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांच्याकडे ग्रामपंचायतीने एका पत्रकाद्वारे केली आहे.

रावेर तालुक्यातील सावदा ते खिरोदारस्त्याची कामे सुरू आहेत. या रस्त्याने वाहनचालक सुसाट वेगाने वाहने चालवतात. काही दिवसांपूर्वी रोझोदा येथील दूध उत्पादक सहकारी संस्थेच्याजवळ भरधाव वेगाने खिरोदाकडे जाणारे चारचाकी वाहन व न्हावी येथील खेमचंद पाटील यांच्या दुचाकी वाहनाचा अपघात झाला. यात त्यांच्या एका चिमुकल्याचा मृत्यू होऊन ते आणि दुसरा मुलगा जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच, २१ सप्टेंबर रोजी रोझोदा येथील घनःश्याम पाटील (वय ६०) हे दुचाकी वाहनाने सावदा येथे जात असताना रस्त्यात अपघात होऊन डोक्याला जबर मार लागल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान २२ सप्टेंबर रोजी रात्री त्यांचे निधन झाले.

सावदा, कोचूर, रोझोदा व खिरोदा येथील रस्त्यावरुन वाहने सुसाट ये-जा करीत असतात. त्यामुळे असे अपघात टाळण्यासाठी अत्यावश्यक ठिकाणी त्वरित गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी रोझोदा येथील ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच अर्चना बढे, उपसरपंच दीपक धांडे यांनी सावदा येथील सामाजिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांच्याकडे एका पत्रकाद्वारे केली आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन

डोंगर कठोरा, ता. यावल : येथून जवळच असलेल्या सांगवी बुद्रुक येथील प्रकाश मंडळ संचलित कै. निंबा दुला चौधरी अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व नामकरण सोहळा २७ रोजी सकाळी १० वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते, तर आमदरा शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, अरुण पाटील, संस्थेचे अध्यक्ष दिनकर चौधरी, चेअरमन चंद्रकुमार चौधरी, चिटणीस उल्हास चौधरी, उपाध्यक्ष रमेश धांडे, व्हा. चेअरमन भालचंद्र भंगाळे तसेच संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत.

Web Title: From the Gram Panchayat at Rozoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.