ग्रामसभांना २०० जणांना राहता येणार उपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:21 AM2021-08-14T04:21:06+5:302021-08-14T04:21:06+5:30
मतदारांसाठी आज शिबिर जळगाव : नवीन मतदार नोंदणी करताना एकल मोबाईल क्रमांक नोंदविलेल्या मतदारांना ई-इपिक ॲप ...
मतदारांसाठी आज शिबिर
जळगाव : नवीन मतदार नोंदणी करताना एकल मोबाईल क्रमांक नोंदविलेल्या मतदारांना ई-इपिक ॲप डाऊनलोड करण्यासाठी शनिवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मदतीने संबंधित मतदान केंद्रावर शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील पात्र मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मदतीने ॲप डाऊनलोड करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
आज पुस्तक प्रकाशन
जळगाव : वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले तारीक शेख यांनी लिहिलेल्या इंडिया इन टॉलरन्स या पुस्तकाचे प्रकाशन १४ रोजी सकाळी १०.३० वाजता गणपती नगरातील रोटरी हॉल येथे होणार आहे. डॉ. विकास बोरोले व डॉ. अ. करीम सालार यांच्याहस्ते हे प्रकाशन होणार आहे. उपस्थितीचे आवाहन शेख यांनी केले आहे.
अमोल सूर्यवंशी यांची निवड
१४ सीटीआर ४०
जळगाव : अमोल प्रकाश सुर्यवंशी यांची रिपाइं युवक तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सपकाळे यांनी नियुक्तीपत्र दिले.
अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
जळगाव : रिपाई (खरात गट) यांच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हा प्रमुख जे.डी. भालेराव यांनी प्रतिमा पूजन केले. शरद धनगर, सिद्धार्थ गव्हाणे, प्रवीण परदेशी, अजीज शेख आदी उपस्थित होते.