बोदवड तालुक्यातील जामठी येथे कोरमअभावी ग्रामसभा तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 03:36 PM2019-05-31T15:36:33+5:302019-05-31T15:37:51+5:30

बोदवड तालुक्यातील जामठी येथील ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली.

Gram Sabha Sabha, in absence of quorum at Jamthi in Bodwad taluka | बोदवड तालुक्यातील जामठी येथे कोरमअभावी ग्रामसभा तहकूब

बोदवड तालुक्यातील जामठी येथे कोरमअभावी ग्रामसभा तहकूब

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामसभेबाबत माहिती नसल्याचा ग्रामस्थांचा आरोपतर ग्रामसभेबाबत ग्रामस्थांना कळविल्याचा सरपंचांचा दावा

बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील जामठी येथील ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली. दुसऱ्यांदाही ग्रामस्थ उपस्थित नसल्याने ती सभा पुढे ढकलण्यात आली आहे.
जामठी येथील ग्राम पंचायतीची ग्रामसभा ३० मे रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु या ग्रामसभेला नागरिक उपस्थित नसल्याने तहकूब करण्यात आली. यानंतर हीच ग्रामसभा पुन्हा त्याच ठिकाणी काही वेळानंतर घेण्याचा निर्णय झाला. परंतु तरीही नागरिकांची उपस्थिती नसल्याने सदर ग्रामसभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत ग्रामस्थांची प्रतिक्रिया घेतली असता ग्रामसभा आहे याची माहिती नव्हती, तर ग्रामसभेबाबत दवंडी देण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतीची आहे. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना ग्रामसभेची माहितीच दिली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, जामठी गावात पाणीटंचाईची समस्या गावात आहे. याबाबत ३१ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली असता दुपारी कार्यालय बंद होते.
याबाबत सरपंच कमलाबाई कडू माळकर यांची प्रतिक्रिया घेतली असता त्या म्हणाल्या, ग्रामसभेची माहिती ग्रामस्थांना दिली होती, परंतु सध्या शेतीच्या कामात ग्रामस्थ व्यस्त आहेत. ग्रामस्थ सकाळीच शेतीच्या कामाला जातात. परिणामी ग्रामस्थ उपस्थित नसणे समजू शकतो.
दरम्यान, ग्रामसेवक राठोड यांची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क केला, मात्र संपर्क झाला नाही.
 

Web Title: Gram Sabha Sabha, in absence of quorum at Jamthi in Bodwad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.