रावेर तालुक्यात ग्रा.पं. निवडणुकीचे पडघम
By admin | Published: June 10, 2017 01:14 PM2017-06-10T13:14:46+5:302017-06-10T13:14:46+5:30
आरक्षण घोषित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी घोषित केला.
ऑनलाईन लोकमत
रावेर, जळगाव, दि. 10 - ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 दरम्यान मुदत संपणा:या चिनावल, वाघोदा बु.।।, खिरोदा प्र यावल, खिर्डी बु.।।, उटखेडा, बलवाडी आदी 25 ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 14 जून ते 3 जुलै दरम्यान प्रभागरचना व प्रभागातील आरक्षण घोषित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी घोषित केला.
त्या अनुषंगाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी 14 जून ते 3 जुलै दरम्यान उभय ग्रा.पं.ची प्रभाग रचना व आरक्षण निश्चीतीचा कार्यक्रम ढगे यांनी घोषित केला आहे, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार सी.एच.पाटील यांनी दिली.
खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू होण्यापूर्वीच तालुक्यातील राजकारणाची बलस्थाने असलेल्या ग्रा. पं.मध्ये प्रभाग रचना व आरक्षण लागू करण्याचा धुराळा उडू लागल्याने सार्वत्रिक निवडणुकचे पडघम वाजू लागले आहेत.
अशा आहेत मुदत संपणा:या ग्रा.पं.
चिनावल, वाघोदा बु.।।, खिरोदा प्र. यावल, खिर्डी बु.।।, उटखेडा, बलवाडी, रोझोदा या मोठय़ा ग्रा.पं.सह नांदुरखेडा, खिरवड, निंभोरासीम, धुरखेडा, पातोंडी, थेरोळे, अजंदे, आभोडा गृप, दोधे, अटवाडे, नेहते, सुनोदा, गाते, थोरगव्हाण, वाघोदा खुर्द, मांगी - चुनवाडे, जानोरी, कुंभारखेडा, सावखेडा बु, सावखेडा खु, भाटखेडा, कोचूर बु.।।, बोरखेडा, कळमोदा, शिंगाडी, कांडवेल या 25 ग्रा.पं.च्या कार्यकाळाची मुदत ऑक्टोबर 2017 ते फेब्रुवारी 2018 दरम्यान संपत येत आहे.