ग्रामसेवक व गटविकास अधिका:यांना जाहीर कार्यक्रमाद्वारे आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2017 06:17 PM2017-05-05T18:17:09+5:302017-05-05T18:17:09+5:30
आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीत होणार साडी, चोळी बांगडीचा आहेर देण्याचा सोहळा
अमळनेर,दि.5 - संत सखाराम महाराज यांची जन्मभूमी असलेले गाव सरपंच आणि गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या दुर्लक्षामुळे मूलभूत सुविधांपासून वंचित राहत आहे. त्यामुळे आजी माजी ग्रामपंचायत सदस्यांनी गांधीगिरी करीत अधिकारी व पदाधिका:यांना साडी चोळी, टिकली बांगडी चा आहेर देण्याच्या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करून पत्रिका वाटप केल्या आहेत. या कार्यक्रमाची सोशल मिडीयावर जोरात चर्चा आहे.
गुरुवार 11 रोजी पिंपळी येथे सकाळी 9 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्या मनीषा महाजन यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पत्रिकेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार शिरीष चौधरी, तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, जि. प. सदस्य मिनाबाई पाटील, पं. स सदस्य निवृत्ती बागुल, माजी उप सभापती उदय पाटील, माजी सभापती श्याम अहिरे, पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक विकास वाघ यांची नावे आहेत. माजी ग्रा.पं. सदस्य मनोज महाजन, विद्यमान सदस्य गुलाब महाजन, वैशाली महाजन, विकासो सदस्य रवींद्र महाजन यांचे निमंत्रक म्हणून नावे आहेत.
या कारणांसाठी केले कार्यक्रमाचे आयोजन
1) पिंपळी गाव स्वच्छतेपासून दूर नेले.
2) 10 दिवसात केवळ 10 मिनिटे पाणी मिळते.
3) पाणी पुरवठा करणा:या मोटारी 8 दिवसात जाळली.
4) ग्रामपंचायत ची कर वसुली 5} पेक्षा कमी झाली.
5) सरपंच व ग्रामसेवक दररोज भेटत नाहीत.
6) कर्तव्यदक्ष ग्रामसेवक वासू मारवडकर याची बदली केली.
7) पाण्यात टी.सी एल चा वापर न करणे.
8) तंटायुक्त गाव केल्याबद्दल .
वारंवार तक्रारी करून तसेच आंदोलने करूनही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
- मनोज महाजन, माजी ग्रा.पं.सदस्य.