रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ग्रामसेवकाला कंटेनरने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:21 PM2017-09-25T13:21:31+5:302017-09-25T13:25:39+5:30
महामार्गावर रस्त्याच्या कडेला थांबून मोबाईलवर बोलत असलेले ग्रामसेवक संतोष लक्ष्मणराव मेहत्रे (वय ४२ रा.शिरसोली प्र.बो.ता.जळगाव मुळ रा.सिंदखेड राजा, जि.बुलढाणा) यांना मागून भरधाव वेगाने येणाºया कंटेनरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे आठ वाजता राष्टÑीय महामार्गावर कालिंका माता चौकाजवळ घडली. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Next
ठळक मुद्देमहामार्गावर कालिंका चौकाजवळील घटना पोटावरुन गेले टायरकंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले
आ नलाईन लोकमत जळगाव, दि २५: महामार्गावर रस्त्याच्या कडेला थांबून मोबाईलवर बोलत असलेले ग्रामसेवक संतोष लक्ष्मणराव मेहत्रे (वय ४२ रा.शिरसोली प्र.बो.ता.जळगाव मुळ रा.सिंदखेड राजा, जि.बुलढाणा) यांना मागून भरधाव वेगाने येणाºया कंटेनरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे आठ वाजता राष्टÑीय महामार्गावर कालिंका माता चौकाजवळ घडली. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशी घडली घटना संतोष मेहत्रे हे करंजी, ता.बोदवड येथे ड्युटीला आहेत. सकाळी आठ वाजता ते घरुन दुचाकीने (क्र.एम.एच.१९ डी.के.४९२१) निघाले. रस्त्यात महामार्गावर कालिंका माता मंदिराजवळ मोबाईलवर कॉल आला. चालत्या दुचाकीवर बोलणे टाळण्यासाठी ते रस्त्याच्याकडेला थांबले. मोबाईलवर बोलत असताना मागून भरधाव वेगाने येणाºया कंटेनरने (क्र.एच.आर.३८ डब्लु ८४९३) दुचाकीला धडक दिली. त्यामुळे मेहत्रे हे रस्त्यावर फेकले गेले व त्यात पोटावरुन कंटेनरचे टायर गेल्याने चिरडले जावून त्यांचा जागीच मृत्यू झाला.