मुक्ताईनगर येथे दत्त जयंतीनिमित्त स्वामी समर्थ केंद्रात दिमाखात सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 17:05 IST2020-12-29T17:05:35+5:302020-12-29T17:05:56+5:30
जुने गावातील श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रात मंगळवारी दत्त जयंती सोहळा उत्साहात झाला.

मुक्ताईनगर येथे दत्त जयंतीनिमित्त स्वामी समर्थ केंद्रात दिमाखात सोहळा
मुक्ताईनगर : ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात व स्वामी नामाच्या जयजयकारात मुक्ताईनगर शहरातील जुने गावातील श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रात मंगळवारी दत्त जयंती सोहळा उत्साहात झाला. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी गणेश पूजन, पादुका पूजन, अभिषेक, महाआरती, श्री गुरुचरित्र पारायण सांगता ,महाप्रसाद आदी कार्यक्रम झाले. यावेळी श्री स्वामी समर्थ सेवेकरी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आकर्षक सजावटीने वेधले लक्ष
श्री दत्तजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ केंद्रात फुलांची व रांगोळ्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यासाठी वैष्णवी वंजारी, पूजा वंजारी, सुवर्णा वंजारी, पूजा चव्हाण, भाग्यश्री बोराखेडे, चैताली जैन या सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.