चाळीसगावी झाले जलसंमेलनाचे शानदार उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2020 02:06 PM2020-11-08T14:06:28+5:302020-11-08T14:07:55+5:30
पहिल्या खान्देशस्तरीय जलसंमेलनाचे रविवारी उदघाटन झाले.
चाळीसगाव, जि.जळगाव : शिवनेरी फाऊंडेशन संचलित पहिल्या खान्देशस्तरीय जलसंमेलनाचे रविवारी सकाळी ११ वाजता शानदार उदघाटन झाले.
आमदार मंगेश चव्हाण प्रेरित शिवनेरी फाऊंडेशनच्या माध्यमातून तालुक्यात मोठी जल चळवळ उभारली गेली असून, याला तांत्रिकतेची जोड देत जलयोद्धांना शास्रशुद्ध मिळावे. यासाठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी आदर्श पाणलोट आराखडा यावर जितेंद्र पाटील, निसर्ग बेट यावर योगेश सोनवणे तर तलाव पुनर्भरण याविषयी भागवत बैरागी यांनी मार्गदर्शन केले.
भूजल अभियानात भाग घेऊन दुष्काळाला हरवत गाव पाणीदार करणा-या जलयोद्धांचा सन्मान आमदार मंगेश चव्हाण, शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण जिल्हा कृषी उपसंचालक अनिल भोकरे, एस. एन. पाटील, अनुराधा पाटील, नंदकुमार वाळेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
चैतन्य नगर तांडा क्रमांक चार यागावास एक लाख ५१ हजाराचे पहिले तर ब्राम्हणशेवगे नाईनगर गावास एक लाख एक हजार रुपयांचे व्दितीय, ७५ हजाराचे तृतीय बक्षिस चिंचगव्हाण सुंदर नगरला देण्यात आले.
ही बक्षिसे आमदार मंगेश चव्हाण यांनी वैयक्तिक प्रोत्साहनपर म्हणून दिली आहे. पाणी फाऊंडेशनचे समन्वयक विजय कोळी यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.