८२ वर्षांच्या आजींचा उत्साह...., ‘स्वेटर’मधील ऊबेने जन्मलं ‘आजी-नातवां’चं नातं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 12:25 PM2020-03-08T12:25:19+5:302020-03-08T12:26:18+5:30

लहानपणापासून विणकामाची आवड ; जळगावसह नागपूर, औरंगाबादमधील बालकांना मिळाले स्वेटर

Grandfather of grandparents born of bored in 'sweaters' | ८२ वर्षांच्या आजींचा उत्साह...., ‘स्वेटर’मधील ऊबेने जन्मलं ‘आजी-नातवां’चं नातं

८२ वर्षांच्या आजींचा उत्साह...., ‘स्वेटर’मधील ऊबेने जन्मलं ‘आजी-नातवां’चं नातं

Next

सागर दुबे
जळगाव : अलिकडे नात्या- नात्यांमधील दुरावा संपत चालला असताना आजही प्रत्येक माणसामध्ये एक नातं शोधणारी माणसं आहेत. कुटुंब संस्थेतून आजी आजोबा हे नातं हद्दपार होत असताना एक आजी हे नातं जपत आहे, माहित नसलेल्या नातवंडांसाठी. आजी अन नातू हे नातं तर चांदोबाच्या गोष्टींनी जवळ येते. पण भेट न होताही या कथेतील आजी आणि नातंवांचं नातं हे ‘स्वेटर’मधील मायेच्या ऊबेने जवळ आणलं आहे.
मृणालीनी विजय चौगुले असं त्यांचं नाव. जळगाव हे त्यांचं गाव अन् वय म्हणाल तर ८२ वर्षे. पण तरुणींनाही लाजवेल अशा उत्साहाने त्या स्वेटर विणतात अन् राज्यातील अनेक भागात राहणाऱ्या त्यांच्या चिमुकल्या नातवांना त्या देतात. लहानपणापासून विणकाम आणि शिवणकाम करण्याची आजींना आवड. ती या वयातही कायम आहे़ अन् तोच उत्साह आजही आहे. कोकणातील माहेर असलेल्या आजी लग्नानंतर जळगावात आल्यावर कुटूंबातील सर्वांसाठी त्यांनी स्वत: स्वेटर बनवून दिले. संसाराचा गाडा हाकत असताना फावल्या वेळेत त्या स्वेटर विणण्याची कामे करून छंद जोपासाच्या़ त्यातच त्यांची गोरगरिब आणि निराधार बालकांसाठी काहीतरी करण्याची ईच्छा होती. त्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली़
हजार नव्हे तर १० हजार स्वेटर विणले हाताने
आवडीचा छंद अन घरबसल्या करता येण्याजोगे काम असल्यामुळे त्या अविरतपणे आजही बालकांसाठी स्वेटर विणुन देत आहेत. आतापर्यंत एक नव्हे तर तब्बल १० हजार स्वेटर त्यांनी स्वत:च्या हातांनी बनवून पाठविले आहेत़ त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना दोन पुरस्कार सुध्दा मिळाले आहेत़ दिवसाला एक स्वेटर त्या विणतात़ त्याचबरोबर त्यांनी शहरातील मंदिरांमधील गुरू जींसाठी आतापर्यंत ३०० ते ४०० आसणे सुध्दा लोकरीपासून बनवून दिली आहेत़ विशेष बाब म्हणजे, या कार्यासाठी त्या एकही रूपया कोणाकडून घेत नाहीत़ दरम्यान, स्वेटर बनविण्यासाठी त्यांना काही दारशूर व्यक्ती लोकर पुरवित असतात़ तसेच जोपर्यंत हातपास चालतात, शरीर साथ देईल तोपर्यंत त्या अनोळखी नातवंडासाठी स्वेटर विणत राहणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
अन् बालकांना मिळाली मायेची ऊब
नागपूर येथे रामकृष्ण मिशनतर्फे गरजुंसाठी मोफत सुरू करण्यात आलेल्या रूग्णालयात जन्मणाºया नवजात बालकांसाठी सन २००५ मध्ये राष्ट्र सेविका समितीतर्फे मदत करण्याचे ठरविण्यात आले होते़ त्यात आजींनी बालकांसाठी स्वेटर बनवून दिले होते़ अन् त्या दिवसांपासून त्यांचा नवजात बालकांना ‘मायेची ऊब’ देण्याच्या कार्याला सुरूवात झाली़ आजही त्या राष्ट्र सेविका समितीच्यावतीने नागपूरला स्वेटर विणून पाठवित असतात़ आतापर्यंत औरंगाबाद, जळगाव यासह राज्यातील विविध शहरांमधील ‘अनोळखी’ नातवडांना त्या जणू मायेची ऊब देत असतात. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत स्वेटरचे काम त्या सुरुच ठेवणार आहेत.

Web Title: Grandfather of grandparents born of bored in 'sweaters'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव