हगणदरीमुक्ती न झाल्यास अनुदान बंद

By Admin | Published: February 3, 2017 12:42 AM2017-02-03T00:42:23+5:302017-02-03T00:42:23+5:30

अमळनेर/पारोळा : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयक विजय सनेर यांच्याकडून विविध भागात पहाणी

Grant off the subsidy if the non-leave is not discharged | हगणदरीमुक्ती न झाल्यास अनुदान बंद

हगणदरीमुक्ती न झाल्यास अनुदान बंद

googlenewsNext

अमळनेर/पारोळा : येथील नगर परिषद हागणदारी मुक्त झाल्याशिवाय शासनाकडून नगरपरिषदेला आगामी काळात कोणतेही अनुदान दिले जाणार नाही. स्वत:चा प्रभाग हागणदारी मुक्त  केला नाही तर नगरसेवकदेखील अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे शहरवासीयांनी आपलं शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगर परिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्याचे समन्वयक विजय सनेर यांनी अमळनेर व पारोळा येथे केले.
अमळनेर
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्याचे समन्वयक विजय सनेर हे आज अमळनेरात आले होते. त्यांनी सकाळी सहा वाजता शहरात ज्या भागात उघड्यावर शौचास जाणा:यांचे प्रमाण जास्त आहे, अशा पैलाड, गांधलीपुरा, सानेनगर, मालखेडा, न.प.दवाखाना भाग, आणि टाकी फाईल भागाचा पाहणी दौरा केला.
 शौचालय नसणा:या कुटुंबप्रमुखांशी त्यांनी संवाद साधत शहराचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. नागरिकांनीदेखील त्यांना अनेक अडचणी सांगितल्या. यावेळी सनेर यांच्यासोबत त्या-त्या भागातील नगरसेवक उपस्थित होते. सानेनगर भागात नगरसेवक नूतन  महेश पाटील यांनी आपला प्रभाग हागणदारीमुक्त करण्यासाठी केलेल्या प्रय}ाचे त्यांनी कौतुक केले. मुख्याधिकारी पी.जी.सोनवणे, करनिरीक्षक भाऊसाहेब देखमुख, प्रभारी प्रशासनाधिकरी संजय चौधरी, पाणी पुरवठा अभियंता श्याम करंजे, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बि:हाडे, कदम , मुकादम आणि स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
यानंतर त्यांनी पालिकेत अधिकारी व नगरसेवक यांची संयुक्त बैठक घेतली.  यावेळी सनेर यांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाबाबत शासनाची भूमिका काय आहे, लोकांचा प्रतिसाद कसा मिळवावा याबाबत मार्गदर्शन केले.
 यावेळी आमदार शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीचे नगरसेवक प्रवीण पाठक, नरेंद्र चौधरी, नूतन महेश पाटील, सलीम टोपी यांच्यासह अनेक नगरसेवक, मुख्याधिकारी पी.जी. सोनवणे, भाऊसाहेब देशमुख, संजय चौधरी, युवराज चव्हाण, संतोष बि:हाडे उपस्थित होते.
पारोळा
अमळनेरात पहाणी करून बैठक घेतल्यानंतर सनेर यांनी पारोळा येथे भेट दिली.
 मार्च 2017 पर्यत संपूर्ण शहर हगणारीमुक्त करायचे आहे. शहर हगणदारी मुक्त न झाल्यास नगरपालिकेचे सर्व प्रकारचे अनुदान बंद होतील असा इशारा विजय सनेर यांनी दिला.
पारोळा नगरपालिकेच्या हगणदारी मुक्त अभियानाची पाहणी केली. मार्च 2017 र्पयत संपूर्ण शहर हगणदरीमुक्त न झाल्यास न.पा.च्या कर्मचा:यांना येणारे वेतनाचा निधी थांबविला जाईल असे सांगितले. याप्रसंगी न.पा.मुख्याधिकारी सचिन माने यांनी मार्च 17 र्पयत संपूर्ण शहर हगणदरीमुक्त करु असे आश्वासन बैठकीत दिले. यावेळी अनिल घुले, एच.एन.पाटील, सुनील कुळकर्णी,  भैयासाहेब पाटील, चंद्रकांत महाजन, जटे यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी हजर होते.    (वार्ताहर)
मुख्य रस्त्याच्या कडेला नागरिक आजही उघडय़ावर शौचास बसतात हे चित्र पाहत या अभियानात पारोळा शहर खूपच मागे आहे. शहराचा दिलेल्या लक्षांकात मागे असल्याने त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.
4शहरात गुड मॉर्निग पथक नाही. शौचालय बांधण्यासाठी पाहिजे तेवढी जनजागृती झालेली नाही. मुख्याधिकारीसह सर्व विभागाच्या कर्मचा:यांनी या अभियानात यशस्वीतेसाठी प्रयत्नशील राहा असा सल्ला दिला.
नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी शहर हागणदारी मुक्ततेसाठी प्रय} करीत आहेत. शहरात अस्वच्छतेचे प्रमाण अधिक आहे. त्यात नागरिकांनी सहभाग घेतला पाहिजे, त्या शिवाय ही योजना यशस्वी होऊ शकत नाही. ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, रद्द होणार आहे. तसेच  निराधार योजनेचा लाभ मिळणार नाही.
- विजय सनेर,
समन्वयक,
स्वच्छ महाराष्ट्र अभियान,

Web Title: Grant off the subsidy if the non-leave is not discharged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.