रावेर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आलेख ९२९ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 10:12 PM2020-08-16T22:12:19+5:302020-08-16T22:13:27+5:30

तालुक्यातील खिर्डी खुर्द, कोळदा, वाघाडी, चिनावल, सावदा गोलवाडे, निरूळ व लोहारा येथील प्रत्येकी १ तर ऐनपूर येथील २ अशा ११ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांनी नवव्या शतकाचा पल्ला गाठून ९२९ वर हा आलेख आता उंचावला आहे.

Graph of Corona victims in Raver taluka on 929 | रावेर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आलेख ९२९ वर

रावेर तालुक्यातील कोरोना बाधितांचा आलेख ९२९ वर

Next
ठळक मुद्देकोरोनामुक्त रुग्णांचा दर ७३.७८ टक्केतालुक्यातील सातही जि प प्राथमिक आरोग्य केंद्रात आता कोरोना चाचणी

किरण चौधरी
रावेर : शहरातील एक, तालुक्यातील खिर्डी खुर्द, कोळदा, वाघाडी, चिनावल, सावदा गोलवाडे, निरूळ व लोहारा येथील प्रत्येकी १ तर ऐनपूर येथील २ अशा ११ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांनी नवव्या शतकाचा पल्ला गाठून ९२९ वर हा आलेख आता उंचावला आहे. तीन महिन्यांत ९२९ जण कोरोना बाधित झाल्याने दररोजची सरासरी १० रूग्ण बाधित होण्याची असली तरी ६८६ रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने कोरानामुक्तीचा दरही ७३.८४ टक्के असल्याने तर मृत्यूदर ६.२ टक्के असल्याने समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, रावेर कोविड केअर सेंटरखेरीज आता ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी तालुक्यातील वाघोड, ऐनपूर, निंभोरा, थोरगव्हाण, खिरोदा, लोहारा व चिनावल या जि.प. प्राथमिक आरोग्य केंद्रात आता अँटीजेन तथा स्वॅब कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून हॉटस्पॉट असलेल्या गावात कोरोना चाचणी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील यांनी दिली.
रावेर शहरातील एक, तालुक्यातील खिर्डी खुर्द, कोळदा, वाघाडी, चिनावल, सावदा गोलवाडे, निरूळ व लोहारा येथील प्रत्येकी १ तर ऐनपूर येथील २ अशा ११ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांनी नववे शतकाच्या वर ९२९ वर पल्ला गाठला आहे. आज तब्बल तीन महिन्यांच्या पूर्ण कालावधीत ९२९ रूग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने दररोजची सरासरी १० रुग्णांवर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचा दरही आता ७३.८४ टक्के झाला असून मृत्यूदर केवळ ६.२ टक्केवर आला आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेची रावेर कोविड केअर सेंटरला कोरोना चाचणी करण्यासाठी जाण्याची मानसिकता नसल्याने त्यांना आता वाघोड, ऐनपूर, निंभोरा, थोरगव्हाण, लोहारा व चिनावल आरोग्य केंद्रात अँटीजेन तथा स्वॅब तपासणीसाठी कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हॉटस्पॉट असलेल्या गावात थेट कोरोना चाचणीसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील यांनी दिली

Web Title: Graph of Corona victims in Raver taluka on 929

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.