पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या आवारातील गवताला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:15 AM2021-04-15T04:15:32+5:302021-04-15T04:15:32+5:30
जळगाव : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारातील कोरड्या गवताला बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. हा प्रकार कळताच, ...
जळगाव : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारातील कोरड्या गवताला बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. हा प्रकार कळताच, घटनास्थळी मनपाचे दोन अग्निशमन बंब दाखल झाले होते. नंतर पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मोकळ्या आवारातील कोरड्या गवतास दुपारी अचानक आग लागली. पाहता-पाहता शंभर मीटर अंतरापर्यंत गवताला आग लागली. हा प्रकार महाविद्यालय आवारातील नागरिकांना कळताच, त्यांनी मनपाच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना आगीची माहिती दिली. त्यानुसार काही वेळातच मनपाचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पाण्याचा मारा करीत अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
एटीएममधील एसीला आग
नवीपेठ परिसरातील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये देखील बुधवारी दुपारी एसीला आग लागल्याची घटना घडली. या आगीत एसी व बॅटरी जळाली. दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर मनपाचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते.