सोशल मीडियाच्या माहितीवरून अमळनेर येथे गावठी कट्टा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 06:03 PM2019-12-08T18:03:44+5:302019-12-08T18:04:56+5:30

सोशल मीडियाच्या माहितीवरून पोलिसांनी सागर निंबा शेटे (वय २६, रा.शिरुड नाका, दत्त मंदिराजवळ, अमळनेर) यास शनिवारी रात्री गावठी कट्ट्यासह अटक केली.

Grass katas seized at Amalner from social media information | सोशल मीडियाच्या माहितीवरून अमळनेर येथे गावठी कट्टा जप्त

सोशल मीडियाच्या माहितीवरून अमळनेर येथे गावठी कट्टा जप्त

Next
ठळक मुद्देगुन्हेगारीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांची करडी नजरअमळनेरात एकास गावठी कट्ट्यासह अटक

संजय पाटील
अमळनेर, जि.जळगाव : सोशल मीडियाच्या माहितीवरून पोलिसांनी सागर निंबा शेटे (वय २६, रा.शिरुड नाका, दत्त मंदिराजवळ, अमळनेर) यास शनिवारी रात्री गावठी कट्ट्यासह अटक केली.
जिल्ह्यात सोशल मीडियावर अफवा पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर निगराणी ठेवताना पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना व्हॉट्सअपवर गावठी कट्टे विक्री होत असल्याची माहिती मिळाली असून, त्यांनी जळगाव, अमळनेर आणि भुसावळ शहरात गावठी कट्टे पकडणे सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सागर शेटे यास पोलिसांनी अटक केली.
पथकांनी उमर्टी (मध्य प्रदेश), चोपडा, अमळनेर, शिरपूर या भागात गावठी कट्ट्यांविषयी तपास केला. २३ रोजी अमळगाव जळोद रोडवरील अमळगाव गावाचे पुढे एक कि.मी. अंतरावर गुरुचरणसिंग आवसिंग बर्नाला (वय २१, रा.उमर्टी, ता.वरला, जि.बडवानी, मध्य प्रदेश) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे दोन गावठी पिस्तूल मॅक्झिनसह जप्त केले. त्याच्याविरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्याकडून माहिती मिळाल्यावरून त्याने अमळनेर, भुसावळ, जळगाव शहरात कट्टे विकल्याची माहिती दिली होती. ८ रोजी अमळनेर शहरातील गलवाडे रोडवरील असोदा मटन हॉटेलजवळील डी.पी.शेजारी सागर निंबा शेटे (वय २६, रा.शिरुड नाका, दत्त मंदिराजवळ, अमळनेर) हा गैरकायदा विनाशस्त्र परवाना शिवाय बाळगताना आढळला. सिल्व्हर व काळ्या रंगाच्या या पिस्तूलची किंमत २५ हजार रुपये आहे. मुठेवर लाल रंगाचा स्टार असलेला गावठा कट्टा व एक जिवंत पितळी राऊंडसह आढळला. त्याच्याविरुध्द अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पिंपळकोठा गोळीबारातील व धुळे रोडवरील दरोड्यातील आरोपीदेखील त्यांच्या संवादावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी नजर ठेवून त्यांचे स्थलांतर, मित्रांशी संवाद, त्यांच्याजवळील पैसे संपल्यानंतर त्यांनी मित्रांकडे पैशांची केलेली मागणी यावरून चार आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सोशल मीडिया गुन्हेगारांना जसा उपयोगी ठरते आहे. तसा आता पोलिसांच्या सतर्कतेने सोशल मीडियाचा वापर गुन्हेगारांसाठी घातक ठरत आहे
अमळनेर शहरात काही तरुण व्हॉटसपवर अवैध शस्त्रांची विक्री-खरेदी करीत असल्याची गोपनिय माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी मिळाली. त्याअनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी सदर अवैध शस्त्राचे रॅकेट शोधकामी डीवाय.एस.पी. राजेद्र ससाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडून सहायक फौजदार अशोक महाजन, विजय पाटील, नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, नरेंद्र वारुळे, मनोज दुसाने, दीपक शिंदे, प्रवीण हिवराळे, किरण धनगर, महेश पाटील, दीपक छबू पाटील तसेच अमळनेर पोलीस स्टेशनचे शरद तुकाराम पाटील, रवींद्र्र अभिमन पाटील व मारवड पोलीस स्टेशनचे पोहेकॉ.विजय साळुखे, सुनील आगोण या पथकाने दोघांना पकडले.

Web Title: Grass katas seized at Amalner from social media information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.