पडद्यामागच्या कोविड योद्ध्याच्या सरस कामगिरीमुळे कोविड रुग्णांना मिळाला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:42 AM2020-12-11T04:42:45+5:302020-12-11T04:42:45+5:30
जळगाव : डॉ. उल्हास पाटील कोविड रुग्णालयातील पडद्यामागच्या कोविड योद्ध्यांनी केलेला सरस कामगिरीमुळे कोविड रुग्णांना दिलासा मिळत आहे. ...
जळगाव : डॉ. उल्हास पाटील कोविड रुग्णालयातील पडद्यामागच्या कोविड योद्ध्यांनी केलेला सरस कामगिरीमुळे कोविड रुग्णांना दिलासा मिळत आहे.
आधीच जीवघेणा कोरोना झाल्यामूळे त्रस्त कोविड रुग्ण व नातेवाइकांना शासनाच्या नियमाप्रमाणे मोफत उपचार मिळविण्यासाठी कागदपत्र व अटींची पूर्तता करावी लागत होती. अनेकांना माहिती नसल्याने दाखल होण्यास अडचण येऊन मनस्ताप सहन करावा लागल्याचे दिसून येताना शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कोविड रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध असताना बऱ्याच रुग्णांना याची माहिती नसल्याने दाखल होताना कागदपत्र सोबत नसायची, सामान्य रुग्णालय, पी.एस.सी. सेंटरमधून येताना शिफारसपत्रही सोबत नसायचे अशावेळी या रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून कार्यालयीन कर्मचारी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही कागदपत्र मागवत त्या रुग्णांचा प्रवेश व तातडीचे उपचार सुरू करण्यास युद्धपातळीवर मदत करत होते. अनेक रुग्णांच्या कागदपत्रातील त्रुटी, अथवा खासगी रुग्णालयातून यायचे असल्यास द्यावे लागणारे नो ऑब्जेक्शन प्रमाणपत्र, अत्यंत गरीब रुग्णांना महागडी इंजेक्शन औषधी उपलब्ध करून द्यायची असल्यास कागदपत्रांची पूर्तता तसेच कोविड रुग्णांचे मेडिक्लेम, मृत्यू दाखला, कोविडमुक्त झाल्यानंतर करावयाच्या कागदपत्राच्या पूर्ततेबाबत या कोविड योद्ध्यांनी डॉक्टर व परिचारिका यांच्यासोबत युद्धपातळीवर काम केले. डॉ. उल्हास पाटील कोविड रुग्णालयातील पडद्यामागच्या कोविड योद्ध्यांनी केलेल्या सरस कामगिरीमुळे रुग्ण व नातेवाइकांना दिलासा मिळत आहे.
या टीममध्ये नरेंद्र रामदास नेमाडे, मिलिंद सुरेश पाटील, राधेश्याम दिनकर पाटील, हेमंत अनिल ढाके, निखील अरुण चौधरी, भारती युवराज चौधरी, किशोर मोहन खलसे, युवराज ज्ञानदेव पाटील, गणेश नांदूरकर, गजानन जाधव, रोशन महाजन, परेश बोरोले, राजू धांडे, गुणवंत कोल्हे, गोपाळ नांदुरकर, बापू नेमाडे, राजू राणे, सागर जैन गोलू, मोहन मयुर, दत्ता, सिद्धू.