विजेतेपदासाठी प्रचंड चुरस
By admin | Published: January 10, 2016 12:38 AM2016-01-10T00:38:21+5:302016-01-10T00:38:21+5:30
आज समारोप विजेत्यांना पारितोषिक वितरण; निरोप देण्याची वेळ आल्याने विद्याथ्र्याना आले गहिवरुन
जळगाव : गेल्या तीन दिवसात युवारंग महोत्सवात सहभागी झालेल्या स्पर्धकांनी बहारदार कलाविष्कार सादर केले. त्यामुळे विजेतेपदासाठी सर्वच स्पर्धकांमध्ये चुरस निर्माण झाली असून सांघिक विजेतेपद कोणत्या संघाला मिळते? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. समारोपाला समिधा गुरू येणार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व बांभोरी येथील एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन युवारंग महोत्सवाला रविवारी समारोप होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य रंगमंच येथे कार्यक्रमाला सुरुवात होईल. यावेळी आमदार गुलाबराव पाटील, चंद्रकांत रघुवंशी, आमदार जयकुमार रावल, खासदार रक्षा खडसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर मनपा आयुक्त संजय कापडणीस, संस्थेचे विश्वस्त आमदार रावसाहेब शेखावत उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सिनेकलावंत समिधा गुरू उपस्थित राहणार आहेत. 81 पारितोषिकांचे होणार वितरण युवारंग महोत्सवात यावर्षी 5 कला मुख्य कला प्रकारांसाठी पाच स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. तसेच 25 उपकला प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय असे पदक दिले जाणार आहेत. यावेळी एकूण 81 पारितोषिक वितरित केले जाणार आहे. नियोजन बैठक गेल्या दोन वर्षापासून युवारंग महोत्सवाच्या समारोपप्रसंगी गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. यावर्षी ती होऊ नये, यासाठी शनिवारी दुपारी महाविद्यालयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व युवारंग महोत्सव आयोजन समितीच्या पदाधिका:यांची बैठक झाली. सायंकाळी परीक्षकांकडून आलेल्या गुणांची व्यवस्थित पडताळणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदाच्या युवारंग महोत्सवासाठी खान्देशातील एकही परीक्षक नाही. अन् विद्यार्थी गहिवरले सलग तीन दिवस खान्देशातील मित्र-मैत्रिणींशी चांगलीच गट्टी जमल्यानंतर रविवारी समारोपाचा कार्यक्रम झाल्यानंतर गावी परतावे लागणार, या विचाराने अनेक तरुण व तरुणींना गहिवरून आल्याचे चित्र येथे दिसून आले. खासदारांनी घेतला विडंबन स्पर्धेचा आनंद खासदार रक्षा खडसे यांनी शनिवारी सायंकाळी युवारंग महोत्सवाला भेट दिली. ब:याच वेळ विडंबन नाटय़ पाहिले. यानंतर विद्याथ्र्याना मार्गदर्शनही केले. यावेळी विश्वस्त माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. महाविद्यालयीन जीवनाचा पुरेपूर आनंद घेत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन खासदार खडसे यांनी केले. यावेळी संचालक प्रा. डॉ. संजय शेखावत, संचालक डॉ. शशिकांत कुलकर्णी, विष्णू भंगाळे, प्राचार्य डॉ. आर. एच. गुप्ता, प्रा. सत्यजित साळवे, विद्यार्थिनी प्रतिनिधी ऐश्वर्या अग्रवाल उपस्थित होते.