हतनुर धरणात आढळली मोठी लालसरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 01:10 PM2017-04-18T13:10:22+5:302017-04-18T13:10:22+5:30

हतनूर धरनावर धोकाग्रस्त असलेला मोठी लालसरी (अल्बीनो प्रकारातील) रेड क्रेस्टेड पोचार्ड हा स्थलांतरित पाणपक्षी आढळून आला आह़े

The great red carpet found in the Hathnak dam | हतनुर धरणात आढळली मोठी लालसरी

हतनुर धरणात आढळली मोठी लालसरी

Next

 भुसावळ/खिर्डी,दि.18- हतनूर धरनावर धोकाग्रस्त  असलेला मोठी लालसरी  (अल्बीनो प्रकारातील) रेड क्रेस्टेड पोचार्ड हा स्थलांतरित पाणपक्षी आढळून आला आह़े भारतातील ही पाहिली नोंद ठरली आह़े आंतरराष्ट्रीय विज्ञानं पत्रिकेने या संशोधनाची दखल घेतली असुन मार्च 2017 मध्ये ते प्रसिद्ध केले आह़े

 नोंदीवर ईएनव्हीआयएसने खुलासा करत अनिल महाजन यांच्या संशोधनावर  शिक्कामोर्तब  केले आह़े डिसेंबर 2014 मध्ये वेटलँण्ड इंटरनेशनल या स्वित्झलँण्ड मधील पर्यावरण संस्थेकडून देशभरात पक्षी गणना झाली़   वरणगाव येथील चातक निसर्ग संवर्धन संस्थेने या गणणेत सहभाग घेत हतनूर धरणावर गणना केली़ या वेळी  पक्षी मित्र शिवाजी जवरे बुलढाणा यांना एक पक्षी  दिसला त्यांनी ही बाब चातक संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल महाजन यांच्या लक्षात आणून दिली त्यांना हा पक्षी स्थलांतरित दुर्मीळ असल्याचे आढळल़े मुंबई येथील पक्षी अभ्यासक डॉ.निखिल भोपळे वरणगावात आल्यानंतर त्यांना या पक्षाबद्दल माहिती दिली आणि या टीमने पुन्हा या पक्षाचा शोध घेतला त्याची छायाचित्रे मिळवण्यात आली़  हतनुर परिसरात आढळून आलेला मोठा लालसरी या पक्ष्याची नोंद यापूर्वी भारतात झालेली आहे किंवा नाही यासाठी महाजन यांनी सर्व माहिती पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार च्याअंतर्गत इएनव्हीआयएसला  पाठवली असता यापूर्वी असा पक्षी भारतात कोठेही नोंदन्यात आलेला नाही असा खुलासा इएनव्हीआयएसने केला़ यापूर्वी इंग्लडमधे नोंद  असल्याचे त्यांना कळवण्यात आल़े 

Web Title: The great red carpet found in the Hathnak dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.