सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आदिवासी गावांमधून गोवर-रुबेला लसीकरणास प्रचंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 05:37 PM2018-12-08T17:37:17+5:302018-12-08T17:38:13+5:30
यावल , जि.जळगाव : यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत आणि अति दुर्गम भागात वसलेल्या जामन्या, गाडऱ्या, लंगडा आंबा व उसमळी ...
यावल, जि.जळगाव : यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत आणि अति दुर्गम भागात वसलेल्या जामन्या, गाडऱ्या, लंगडा आंबा व उसमळी या आदिवासी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शुक्रवारी झालेल्या गोवर-रुबेला लसीकरणास प्रचंड प्रतिसाद मिळाला. ९५ टक्के विद्यार्थ्यांना ही लस देण्यात आली. आदिवासी पालकांनी या राष्ट्रीय मोहिमेस प्रचंड प्रतिसाद दिला आहे. ६२९ विद्यार्थ्यांपैकी ५९५ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
तालुक्यात सध्या गोवर-रुबेला लसीकरण मोहीम सुरू आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या जामन्या, गाडºया, लंगडाआंबा आणि उसमळी ही गावे अति दुर्गम भाग म्हणून ओळखली जातात. शुक्रवारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बºहाटे हे पथकासह आदिवासी गावात पोहचले. सुरवातीस डॉ.बºहाटे यांनी गोवर आजाराची लक्षणे व त्यापासून बालकांना होणाºया अपायाची माहिती देवून आजार समूळ नष्ट करण्यासाठी गोवर-रुबेलाचे लसीकरणाची गरज असल्याचे सांगितले.
आदिवासी पालकांनी आपल्या मुलास लसीकरण करण्याासंदर्भात प्रोत्साहीत केले. गाडºया येथील शाळेतील ११४ विद्यार्थ्यापैकी १०७, जामन्या ४५० पैकी ४२६, उसमळी येथील ४५ पैकी ४३ तर लंगडा आंबा येथील २० पैकी १९ बालकांना लसीकरण करण्यात आले. लसीकरणानंतर बालकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. पथकातील डॉ.गोरव भोईटे, डॉ.ठाकरे, ग्रामसेवक रुबाब तडवी, पर्यवेक्षिका भूमिका सोनवणे, आरोग्य सेविका महेमुदा तडवी, शोभा जावळे, अनिता नेहेते, शाबदान तडवी, अरविंद जाधव, मुबारक तडवी, बालाजी कोरडे, बारी यांच्यासह सरपंच शेपाबाई बारेला, पोलीस पाटील तेरसिंंग बारेला, गाडºयाचे मुख्याध्यापक अरूण बारेला, लंगडा आंबाचे भायाराम बारेला, उसमळीचे लकड्या बारेला यांच्यासह शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले. एकीकडे काही ठिकाणी गैरसमज पसरवले जात असताना दुर्गम भागातील आदिवासी गावात मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आदिवासी बांधवांचे प्रशासनाकडून कौतुक केले जात आहे.