बांबरूड राणीचे येथील विंध्यवासिनी माता मंदिर परिसरात हरित चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:16 AM2021-07-27T04:16:19+5:302021-07-27T04:16:19+5:30

विंध्यवासिनी माता मंदिर कार्यकारी समिती अध्यक्ष गंगारामबाबा देवरे हलवाई यांच्या हस्ते औदुंबर वृक्षलागवड करण्यात येऊन त्यांचे मार्गदर्शनात वृक्षलागवड करण्यात ...

Green movement in the vicinity of Vindhyavasini Mata Mandir at Bambarud Raniche | बांबरूड राणीचे येथील विंध्यवासिनी माता मंदिर परिसरात हरित चळवळ

बांबरूड राणीचे येथील विंध्यवासिनी माता मंदिर परिसरात हरित चळवळ

Next

विंध्यवासिनी माता मंदिर कार्यकारी समिती अध्यक्ष गंगारामबाबा देवरे हलवाई यांच्या हस्ते औदुंबर वृक्षलागवड करण्यात येऊन त्यांचे मार्गदर्शनात वृक्षलागवड करण्यात आली. सर्वोदय संस्था व वृक्षलागवड व संवर्धन हा अतूट बंध झाला असल्याने परिसरातील विविध ठिकाणी यावर्षी वृक्षलागवड जोमाने सुरू असून, लागवड केलेली वृक्ष जगविलीच जावीत हा प्रधान हेतू संस्थेने डोळ्यासमोर ठेवला आहे.त्यासाठी संस्थेने हरित निर्माण हा उपक्रम हाती घेतला असून, गेल्या तीन वर्षांपासून हजारावर वृक्षलागवड करून जगविलीसुद्धा आहेत.

संस्थेच्या उद्देशास बांबरूड राणीचे येथील विंध्यवासिनी माता मंदिर कार्यकारी समितीसोबत जोडल्या गेलेल्या माउली वृक्षप्रेमी ग्रुपने सकारात्मक प्रतिसाद देत या मंदिर परिसरात सर्वोदय संस्थेच्या मदतीने वृक्षलागवड करून घेत ती जगविण्याची हमी घेतली आहे.

अजूनही मोठ्या प्रमाणात या मंदिर परिसरात टप्प्याटप्प्याने वृक्षलागवड करण्याचा सर्वोदय संस्था व माउली वृक्षप्रेमी ग्रुप यांचा मानस आहे. त्यामुळे भविष्यात या मंदिर परिसरात वृक्षराई नटून सृष्टीचे सौंदर्य वाढणार, हे मात्र निश्चित आहे. त्यातूनच अध्यात्म उठून दिसेल, असा आशावाद माउली वृक्षप्रेमी ग्रुप सदस्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी युवकांसोबतच लहानग्यांचा उत्साह व हातभार मोठ्या प्रमाणात लाभला, हे विशेष. यासाठी संपूर्ण लागवडीत माउली वृक्षप्रेमी ग्रुपने परिश्रम घेतले.

260721\26jal_3_26072021_12.jpg

बांबरूड राणीचे येथील विंध्यवासिनी माता मंदिर परिसरात हरित चळवळ

Web Title: Green movement in the vicinity of Vindhyavasini Mata Mandir at Bambarud Raniche

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.