हिरव्या वेलदोड्याच्या भावात प्रती किलो ४०० रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:51 AM2018-08-30T11:51:47+5:302018-08-30T11:53:48+5:30

केरळमधील पूरस्थितीचा फटका

Green Velodora worth Rs 400 per kg | हिरव्या वेलदोड्याच्या भावात प्रती किलो ४०० रुपयांनी वाढ

हिरव्या वेलदोड्याच्या भावात प्रती किलो ४०० रुपयांनी वाढ

Next
ठळक मुद्देजायपत्री, जायफळ, काळेमिरे, खोबरेही वधारलेदोन आठवड्यात दीडपटीने वाढ

विजयकुमार सैतवाल
जळगाव : केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मसाल्याची आवक कमी होऊन प्रचंड भाववाढीने मसाला बाजार चांगलाच ‘गरम’ झाला आहे. हिरवे वेलदोडेच्या भावात ३०० ते ४०० रुपये प्रती किलोने वाढ झाली आहे. त्या सोबतच जायपत्री, जायफळ, काळे मिरे, खोबरे, सुंठ यांच्या भावातही चांगलीच तेजी आली आहे. मसाल्यातील विविध घटक पदार्थांचा समावेश असलेल्या खान्देशातील खास मसाल्यालाही भाववाढीचा ‘झणका’ बसला आहे.
केरळमध्ये मसाल्याच्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तेथूनच जवळपास सर्व ठिकाणी हे मसाल्याचे पदार्थ पोहचतात. मात्र पूरस्थितीमुळे तेथील मसाल्याचा बाजार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून मसाल्याच्या पदार्थांमध्ये भाववाढ होत आहे.
दोन आठवड्यात दीडपटीने वाढ
जळगावात मसाल्याची मोठी बाजारपेठ आहे. हिरवे वेलदोड्याचे भाव पाहता त्यात सर्वाधिक वाढ झाली असून दोन आठवड्यात ते जवळपास दीडपटीने वाढले आहे. ९०० रुपये प्रती किलो असणारे हिरवे वेलदोडे १२०० रुपये तर १४५० रुपये प्रती किलो असणारे हिरवे वेलदोडे १९०० रुपये प्रती किलोवर पोहचले आहे. त्या खालोखाल जायपत्रीच्या भावात २५० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. १५५० रुपये प्रती किलो असलेली जायपत्री १८०० ते १८५० रुपयांवर पोहचली आहे.
या सोबतच जायफळाचे भाव ६२० रुपये प्रती किलोवरून ७०० रुपये प्रती किलो झाले आहेत. त्यात कोलंबो येथून येणाऱ्या जायफळाचे भाव तर ८५० रुपये रुपये प्रती किलोवर पोहचले आहेत. काळे मिºयांच्या भावातही ५० ते ८० रुपये रुपये प्रती किलोने वाढ होऊन ते ५०० रुपयांवरून ५५० तर ९०० रुपयांवरून ९८० रुपये प्रती किलो झाले आहेत.
खोबºयाच्याही भावात ३० रुपये रुपये प्रती किलोने वाढ झाली असून ते २५० रुपयांवरून २८० रुपये प्रती किलो झाले आहे.
सुंठच्या भावातही ५० ते ७५ रुपयांनी वाढ होऊन ती २२५ रुपयांवरून ३०० रुपयांवर पोहचल्याचे व्यापाºयांनी सांगितले. या भावात आणखी तेजी येण्याची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.
ऐन हंगामात हिरव्या वेलदोड्याला फटका
दरवर्षी जुलैच्या अखेर व आॅगस्टच्या सुरुवातीला नवीन हिरवे वेलदोडे येण्यास सुरुवात होते. नेमके त्याच वेळी पुराचा फटका बसल्याने हिरवे वेलदोड्याची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे. काही व्यापाºयांनी गोदामात ठेवलेला मालही ओला झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्यासह सर्वच भागात हिरवे वेलदोडे बाजाराला फटका बसण्याची चिन्हे आहेत.
केरळातील व्यापारी बोलण्यास तयार नाही
केरळमधून येणाºया मसाल्याच्या बाबतीत जळगावातील व्यापारी तेथील व्यापाºयांशी संपर्क साधून मालाबाबत विचारणा करीत असले तरी तेथील व्यापारी काहीच सांगायला तयार नसल्याचे व्यापाºयांनी सांगितले. त्यामुळे मसाला बाजार अस्थिर होत असल्याचे चित्र आहे.
खान्देशातील मसाल्यावरही परिणाम
मसालेदार भाज्या हा खान्देशातील खास मेनू असून त्यासाठी विविध मसाल्याचे घटक पदार्थ असलेला खास मसालाही बाजारात उपलब्ध असतो. त्यास खान्देशसह इतरही मोठी मागणी असते. मात्र सध्या मसाल्याच्या आवकवर परिणाम झाल्याने खान्देशातील हा मसालाही वधारला आहे. २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम, एक किलो अशा वेगवेगळ््या वजनात उपलब्ध असलेल्या या मसाल्याच्या पाकिटांचे भाव ३० ते ४० टक्क्यांनी वधारले आहेत.

केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे हिरवे वेलदोड्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या सोबतच जायपत्री, जायफळ, काळे मिरे, खोबरे, सुंठ यांच्या भावात वाढ झाली आहे.
- सुरेश बरडिया, मसाला व्यापारी, जळगाव.

Web Title: Green Velodora worth Rs 400 per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.