कवी संमेलनातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:11 AM2020-12-07T04:11:05+5:302020-12-07T04:11:05+5:30

सत्यशोधकी साहित्य परिषद व ॲड.एस.ए.बाहेती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कविसंमेलनाचे आयोजन करण्यात ...

Greetings to Dr. Babasaheb Ambedkar from the Poetry Conference. | कवी संमेलनातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.

कवी संमेलनातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.

Next

सत्यशोधकी साहित्य परिषद व ॲड.एस.ए.बाहेती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी मुस्ताक करिमी होते. उद्घाटन व्हीएनआयटी नागपूर येथील प्रा. डॉ. श्रीराम सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मनपा. शिक्षण सभापती प्रा. डॉ. सचिन पाटील, प्राचार्य डॉ. अनिल लोहार व डॉ. मिलिंद बागुल उपस्थित होते.

या संमेलनात कवी दिलीप सपकाळे यांनी '''''''' तुझी बुद्धिमत्ता केवढी '''''''' ही कविता सादर केली, तर किशोर नेवे यांनी ''''''''तुझी लेखणी'''''''' ही कविता सादर केली. तसेच मंगल पाटील यांनी ''''''''बाबा तुम्ही'''''''' तर अरुण कुमार जोशी यांनी ''''''''शब्द होते म्हणून'''''''' ही कविता सादर केली. सूत्रसंचालन बापू पानपाटील यांनी तर आभार विजय लुल्ले यांनी मानले.

Web Title: Greetings to Dr. Babasaheb Ambedkar from the Poetry Conference.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.