अन्नदान, वृक्षारोपण आदी कार्यक्रमांद्वारे गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:31 AM2020-12-13T04:31:33+5:302020-12-13T04:31:33+5:30

जळगाव : स्व. गोपीनाथराव मुंडे उत्सव नियोजन समितीतर्फे शनिवारी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, अन्नदान, वृक्षारोपण, मास्क ...

Greetings to Gopinath Munde through food donation, tree planting etc. | अन्नदान, वृक्षारोपण आदी कार्यक्रमांद्वारे गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

अन्नदान, वृक्षारोपण आदी कार्यक्रमांद्वारे गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन

Next

जळगाव : स्व. गोपीनाथराव मुंडे उत्सव नियोजन समितीतर्फे शनिवारी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, अन्नदान, वृक्षारोपण, मास्क वाटप आदी विविध कार्यक्रम घेत अभिवादन करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिरात ७१ जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.

मेहरूण परिसरातील साईबाबा मंदिर परिसरात सकाळी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, फटाक्यांची आतषबाजीने गोपीनाथ मुंडे यांचा जयघोष करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे, जयंती उत्सव नियोजन समितीचे अध्यक्ष तथा स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक विशाल त्रिपाठी, कैलास सोनवणे, चेतन सनकत, सभागृह नेते ललित कोल्हे, नगरसेविका रेश्मा काळे, नाथ फाउण्डेशनचे अध्यक्ष अशोक लाडवंजारी, भाजप महागराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, रमेश लाडवंजारी, चंदन महाजन, जयराम पाटील, रमेश चाटे, दामोदर सानप, संतोष वाघ, समाधान चाटे, विजय लाडवंजारी, योगेश घुगे, पिंटू सांगळे, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी गरजू नागरिकांना अन्नदानही करण्यात आले. तसेच मेहरूण भागात मनपाचे वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य प्रशांत नाईक यांच्या हस्ते विविध प्रजातींच्या ३० रोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाला श्रीराममंदिर संस्थांनचे सहकार्य मिळाले. यशस्वीतेसाठी उत्सव नियोजन समितीतर्फे अध्यक्ष प्रशांत नाईक, सचिन लाडवंजारी, अनिल घुगे, मुकेश नाईक, संतोष चाटे, तेजस वाघ, ऋषिकेश वाघ, विशाल घुगे, योगेश लाडवंजारी, योगेश नाईक, गोविंद वंजारी, कृष्णा सानप, प्रतीक चाटे, ऋषिकेश चाटे, खन्ना पाटील, राहुल सानप, योगेश घुगे, कैलास चौधरी, राकेश लाडवंजारी, प्रशांत वंजारी, विक्रांत अहिरे, सागर लाडवंजारी, कैलास वंजारी, किशोर वंजारी, गजानन वंजारी योगेश नाईक आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Greetings to Gopinath Munde through food donation, tree planting etc.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.