विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थातर्फे महामानवाला अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:10 AM2020-12-07T04:10:34+5:302020-12-07T04:10:34+5:30
श्री नवलधाम गुगामेढी बहुउद्देशिय संस्थेतर्फे माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. यावेळी आत्मचरण ढंढोरे, ...
श्री नवलधाम गुगामेढी बहुउद्देशिय संस्थेतर्फे माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे यांच्याहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. यावेळी आत्मचरण ढंढोरे, संजय गोयर, भगवान ढंढोरे, संदीप ढंढोरे, रोहित बेंडवाल,आशितोष ढंढोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संविधान जागर समिती
संविधान जागर समितीतर्फे रेल्वे स्टेशन समोरील डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेस संयोजक मुकुंद सपकाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, सचिन धांडे, अमोल कोल्हे, शालिग्राम मानकर, दिलीप सपकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सारांश फाऊंडेशन
सारांश फाऊंडेशनतर्फे रेल्वे स्टेशन समोरील डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यास अध्यक्षा निलू इंगळे यांच्याहस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी इंदु मोरे, संध्या सपकाळे, जिजाबाई दाभाडे, इंदुमती मोरे, सुनिता सपकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(खरात गट) तर्फे जिल्हाध्यक्ष जे.डी.भालेराव यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव प्रवीण परदेशी, सतिश परदेशी, सिद्धार्थ गव्हाणे, निकीता सोनवणे, जावेद खाटिक, हर्षल साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संस्कृती माध्यामिक विद्यालय
संस्कृती माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका डी. सी. येवले यांच्याहस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या ऑनलाईन कार्यक्रमात सुजाता पाटील, नम्रता विसपुते, मयुर घोडेके, अंजली हरेल, कपील चव्हाण या विद्यार्थांनी सहभाग घेतला.
अभिनव विद्यालय
अभिनव प्राथमिक विद्यालयात महानिर्वाण दिनानिमित्त अध्यापिका विद्यालयाच्या प्राचार्या सुवर्णा चौधरी यांच्याहस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अभिनव शाळेचे मुख्याध्यापक ललित नेमाडे व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.