महात्मा फुले यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:14 AM2021-04-12T04:14:43+5:302021-04-12T04:14:43+5:30
जळगाव : थोर समाज सुधारक, शेतक-यांचे कैवारी, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्ताने विविध संस्था संघटनांतर्फे ...
जळगाव : थोर समाज सुधारक, शेतक-यांचे कैवारी, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्ताने विविध संस्था संघटनांतर्फे महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियम पाळून तसेच मास्क, सॅनिटाइझरचा वापर करून गर्दी न करता हे कार्यक्रम झाले.
भाजपतर्फे अभिवादन
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे फुले मार्केट येथे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. नगरसेवक राजू मराठे, ओबीसी आघाडी अध्यक्ष जयेश भावसार, कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, उद्योग आघाडी अध्यक्ष संतोष इंगळे, हॉकर्स आघाडी अध्यक्ष नंदू पाटील, फुले हॉकर्स असोसिएशन अध्यक्ष प्रशांत माळी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्याहस्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, आर. एस. पाटील, अमोल जुमडे, सुयोग कुलकर्णी आदी उपस्थित होते.
खान्देशकन्या महिला मंडळ
खान्देशकन्या महिला विकास मंडळातर्फे महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा मंगला बारी यांनी पुष्पहार अर्पण केला व पूजन केले. संस्थेच्या सचिव वंदना बारी, संगीता बारी, सोनल कपोते, पूनम बारी, छाया बारी तसेच कलावंत तुषार वाघुळदे, अनिल पाटील आदींची उपस्थिती होती.
दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र व राष्ट्रीय हरित सेना
दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र व राष्ट्रीय हरित सेनेतर्फे प्रा. वासुदेव पाटील व निसर्ग मित्र समिती सचिव शक्ती महाजन यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. हरित सेना मास्टर ट्रेनर प्रवीण पाटील उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)तर्फे फुले मार्केट येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पुष्पहार अर्पण केला. मिलिंद सोनवणे, सागर सपकाळे, प्रताप बनसोडे, नरेंद्र मोरे उपस्थित होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामधील फुले शाहु आंबेडकर विचारमंच, विचारधारा प्रशाळा, बुद्धिस्ट अध्ययन व संशोधन केंद्र, डॉ.आंबेडकर विचारधारा विभाग, महात्मा जोतिबा फुले व संशोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व डॉ.आंबेडकर विचारधारा अभ्यास मंडळ यांच्या विद्यमाने क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले ते प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव ऑनलाईन आयोजित केला. उदघाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. ई. वायूनंदन यांनी मार्गदर्शन केले. शाहीर रमेश धुरंधर ''बुद्ध कबीर भीमराव फुले '' हे गीत सादर केले. पुरोगामी चळवळीतील बेगडीपनाच्या अस्तित्वाची अकार्यक्षमता आणि मरगळ या विषयावर झालेल्या परिसंवादात प्रा.प्रदिप सोळंके, औरंगाबाद, प्रा.संबोधी देशपांडे, चोपडा यांनी विषयाला अनुसरून मांडणी केली. परिसंवादाचा अध्यक्षीय समारोप प्रा. म. सु. पगारे यांनी केला. सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ.विजय घोरपडे यांनी केले तर परिचय प्रा. हर्षल पाटील यांनी करून दिला. आभार डॉ. अजय सुरवाडे यांनी मानले.
चांदसरकर विद्यालय
गिरिजाबाई नथू सेठ चांदसरकर प्राथमिक विद्यामंदिरात प्रतिमा पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक श्याम ठाकरे, जयश्री पाटील, स्वप्नील भोकरे, महेश तायडे, भूषण अमृतकर यांनी परिश्रम घेतले.
दर्जी फाउंडेशन
दर्जी फाउंडेशनतर्फे प्रा.गोपाल दर्जी यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. संचालिका ज्योती दर्जी, व्यवस्थापक एस.एम. मदाणी व सहकारी उमेश पाटील, विजय कोजगे, प्रताप चौधरी, राजेश अहिरे यांनी सहकार्य केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यशवंत घोडेस्वार, गौतम सपकाळे, आनंदा तायडे, राजू सपकाळे यांनी पूजन केले. नाना डोंगरे, वासुदेव कुकरेजा, युवराज नन्नवरे, दिनेश सपकाळे, विनोद सोनवणे, दीपक तायडे, सिद्धार्थ तायडे, विकास तायडे, कैलास सुरवाडे, भारत नन्नवरे, सागर घोडेस्वार, सागर तायडे, अशोक बाविस्कर, अंकुश सोनवणे, सचिन तायडे, राजू शिरसाट, सागर सपकाळे, सचिन सपकाळे, आनंद सपकाळे, सुभाष ब्राह्मणे आदी उपस्थित होते.
बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशन
बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशनतर्फे अध्यक्षा सुधा काबरा. यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी स्वाती सोमाणी, मनिषा तोतला, मिनल लाठी, सुलभा लढ्ढा आदी उपस्थित होते.