शाळांमध्ये क्रांतीवीरांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:19 AM2021-08-12T04:19:48+5:302021-08-12T04:19:48+5:30
जळगाव : शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना, तसेच शाळांमध्ये क्रांती दिनासह जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
जळगाव : शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना, तसेच शाळांमध्ये क्रांती दिनासह जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी क्रांतीकारकांची वेशभूषा साकारून भाषणे केली तर शिक्षकांनी सुध्दा क्रांती दिनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कमल राजाराम वाणी विद्यालय (फोटो- १० सीटीआर ३७)
क्रांती दिनानिमित्त कमल राजाराम वाणी विद्यालयात मुख्याध्यापक डॉ.रवींद्र माळी व नीलेश नाईक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. उपशिक्षक राजेंद्र पवार यांनी महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, सरदार वल्लभभाई पटेल, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. वंदना नेहते यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपक्रमासाठी नरेंद्र वारके, उज्ज्वला जाधव, रशिदा तडवी, श्रीकांत पाटील, राहुल धनगर, संगीता निकम, सुवर्णा सोनार व भूषण बऱ्हाटे आदींनी परिश्रम घेतले.
मानव सेवा विद्यालय
भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांना मानवसेवा विद्यालयात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी क्रांतिकारक भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, मुक्ता पाटील, माया अंबटकर आदींची उपस्थिती होती. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांची वेशभूषा साकारून घोषवाक्य सादर केले. यात वेदांत पाटील प्रथम, चैतन्य पाटील द्वितीय, तर स्रेहा विसपुते तृतीय ठरली. गिरीश जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राज प्राथमिक विद्यालय
राज प्राथमिक व माध्यमिक आणि सुनील महाजन ज्युनिअर कॉलेज येथे मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर क्रांती दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. सूत्रसंचालन एस. ए. खंडारे यांनी केले. एस. ए. पाटील यांनी आभार मानले.
सुजय महाजन विद्यालय
सुप्रीम कॉलनी भागातील सुजय महाजन व मातोश्री प्रेमाबाई जैन विद्यालयात क्रांती दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना क्रांती दिनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
संस्कृती विद्यालय
मेहरूण येथील संस्कृती विद्यालयात क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू, सुकदेव या शहीद वीरांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका डी.सी.येवले यांनी प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
धामणगाव येथे आदिवासी दिन साजरा
धामणगाव येथे आदिवासी दिन साजरा करण्यात आला. मुकेश सोनवणे यांच्याहस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ॲड. गणेश सोनवणे यांनी आदिवासी दिनाचे महत्व पटवून दिले. याप्रसंगी हेमेंद्र सपकाळे, माजी सरपंच आनंदा सपकाळे, आर.आर.पाटील आदींची उपस्थिती होती.
सर्व शक्ती सेना (फोटो- ११ सीटीआर ०१)
सर्व शक्ती सेना कार्यालयात जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय मोरे हे होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला प्रा.संजय मोरे आणि कृष्णा सावळे, ॲड.अजय कोळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर मोरे यांनी क्रांती दिन व आदिवासी दिनाचे महत्व सांगितले. या कार्यक्रमाला प्रा. हर्षवर्धन भालेराव, प्रा. सुनील तायडे, प्रा. अशोक सांगवीकर, कृष्णा सावळे, गजानंद काडेले, विनोद सपकाळे, सोनु सूर्यवंशी, विनोद ठाकरे, सचिन सुरवाडे, अभिजीत तायडे, युवराज कोळी आदी उपस्थित होते.