रॉबर्ट गील यांना भुसावळात अभिवादन
By admin | Published: April 10, 2017 12:33 PM2017-04-10T12:33:42+5:302017-04-10T12:33:42+5:30
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील चित्रांचा शोध लावणारे मेजर रॉबर्ट गील यांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त सोमवार 10 रोजी सकाळी भुसावळात त्यांच्या समाधीस्थळी विशेष कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले.
Next
भुसावळ, दि.10- जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील चित्रांचा शोध लावणारे मेजर रॉबर्ट गील यांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त सोमवार 10 रोजी सकाळी भुसावळात त्यांच्या समाधीस्थळी विशेष कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले.
मेजर रॉबर्ट गील विषयावरील अभ्यासक व जळगावचे डॉ.पी.डी. जगताप आणि सहकारी गेल्या 29 वर्षापासून भुसावळ येथे येऊन कब्रस्तानात एकत्र जमून मेजर रॉबर्ट गील यांना त्यांच्या स्मृतिदिनी श्रद्धांजली अर्पण करतात. आजही त्यांना त्यांच्या स्मृतीदिनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
डॉ.पी.डी.जगताप, डॉ.दिनेश महाजन, कमलकुमार जैन, अजय पाटील, विकास मौर्य बनारस, विश्वास वळवी, प्रा.नीलेश गुरचळ, प्रा.डॉ.गिरीश कोळी, प्रा. मिलिंद सुरवाडे, प्रा.डॉ. दयाधन राणे, प्रा.जतीनकुमार मेढे, प्रा.दीपाली पाटील, प्रा.डॉ.सोपान बोराटे, सुरेश अमोदकर आदी उपस्थित होते.
रॉबर्ट गीलमुळे जगात भुसावळची ओळख
जगप्रसिद्ध अजिंठा लेणींमधील नैसर्गिक रंगातील चित्र प्रथम जगासमोर आणणारे मेजर रॉबर्ट गील यांच्यामुळे भुसावळ जगात ओळखले जात असल्याची मनोगत डॉ.जगताप यांनी याप्रसंगी व्यक्त केले.