शाळा-महाविद्यालयांमध्ये संत गाडगेबाबांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:17 AM2021-02-24T04:17:25+5:302021-02-24T04:17:25+5:30
जळगाव : राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ...
जळगाव : राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थांना संत गाडगेबाबांच्या कार्याचीही माहिती देण्यात आली.
संस्कृती विद्यालय
संस्कृती माध्यामिक विद्यालयात संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका डी. सी. येवले यांच्या हस्ते झाले. यावेळी आश्विनी फालक, सुहास कोल्हे, माधुरी बिजलपुरे, ईश्वर पाटील, विवेकानंद तायडे, कविता पाटील, वसंत महाजन, आदी शिक्षक उपस्थित होते.
राज प्राथमिक विद्यालय
राज प्राथमिक विद्यालय व डॉ. सुनील महाजन ज्युनिअर कॉलेजमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपशिक्षिका जयश्री महाजन, प्राथमिकचे मुख्याध्यापक सी. व्ही. पाटील, आदी शिक्षक उपस्थित होते. सुशील सुरवाडे यांनी सूत्रसंचालन, तर डी. वाय. बऱ्हाटे यांनी आभार मानले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. यावेळी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय. एस. महाजन, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, अशोक पाटील, परेश कोल्हे, उज्ज्वला शिंदे, दिव्या भोसले, नामदेव पाटील, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, सलीम इनामदार, परेश कोल्हे, संजय चव्हाण, सतीश चव्हाण उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटातर्फे जिल्हाध्यक्ष जे. डी. भालेराव यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले.. यावेळी समता-जागृती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष यशवंत घोडेस्वार, जिल्हा सरचिटणीस प्रवीण परदेशी यांच्यासह सिद्धार्थ गव्हाणे, दीपक बिऱ्हाडे, अजिज शेख, फिरोज पिंजारी, अण्णा अडकमोल, किरण सुरवाडे, सुनील कुंभार, रवींद्र जाधव, नरेंद्र सपकाळे उपस्थित होते.
सुजय विद्यालय
सुजय महाजन प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापिका अर्चना सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. ऑनलाईन झालेल्या कार्यक्रमात गौरव सरोदे, साहिल चौधरी, प्रतीक्षा भोलाणकर, काजल पवार या विद्यार्थांनी सहभाग घेतला. यशस्वितेसाठी पूजा तवटे, हितेंद्र पाटील, मुक्ता देशमुख उपस्थित होते.
जैन माध्यामिक विद्यालय
कै. मातोश्री प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. ऑनलाईन झालेल्या कार्यक्रमात आरती इथापे, खुशबू तडवी, राकेश गायकवाड, कृष्णा मराठे, रेशम इथापे, जयेश बाविस्कर, मयूर शिरसाट या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
आर. आर. विद्यालय
आर. आर. विद्यालयात मुख्याध्यापक डी. टी. पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यानंतर त्यांनी गाडगेबाबांच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाला सर्व शिक्षकवृंद उपस्थित होता.