शहरातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व शासकीय कार्यालयांमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:13 AM2021-01-04T04:13:50+5:302021-01-04T04:13:50+5:30
पांडुरंग मुंदडे, विद्यालय पांडुरंग मुंदडे विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला बापू बाविस्कर यांच्या हस्ते पुष्पहार ...
पांडुरंग मुंदडे, विद्यालय
पांडुरंग मुंदडे विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला बापू बाविस्कर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक विठ्ठल राजोळे, शिक्षिका रंजना चौधरी, राजेंद्र उंबरकर, रमेश शिरसाठ, संजीव तडवी, गणेश भालेराव आदी कर्मचारी उपस्थित होते.
गुळवे मुलींचे विद्यालय
पुष्पावती खुशाल गुळवे मुलींच्या विद्यालयात मुख्याध्यापिका एच.आर. पाटील यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आल्या. यावेळी शिक्षिका कांचन नारखेडे, पर्यवेक्षक डी.आर. माळी आदी कर्मचारी उपस्थित होते.
अभिनव विद्यालय
शिक्षण मंदिर संस्थेच्या अध्यापिका विद्यालय व अभिनव विद्यालयात विद्यालयाच्या प्राचार्या सुवर्णा चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक ललित नेमाडे, जागृती भोळे, ज्योती इंगळे आदी शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
न्यू इंग्लिश मीडियम स्कूल
येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मुख्याध्यापक योगेश चौधरी यांच्याहस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी बालिका दिनही साजरा करण्यात आला. उपस्थित विद्यार्थ्यांना सावित्रीबाई यांच्या कार्याची माहिती देण्यात आली.
जैन माध्यामिक विद्यालय
दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित रत्ना जैन प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापक आशा साळुंखे यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपशिक्षक रामकृष्ण कोल्हटकर यांनी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त आशा साळुंखे यांचा सत्कार केला, तर तुकाराम पाटील यांनी उपशिक्षिका मीनल झोपे यांचा सत्कार केला.