‘ग्रेटा थनबर्ग’च्या हातात आव्हाणेकर तरुणाईचा हात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:23 AM2019-09-25T11:23:11+5:302019-09-25T11:23:43+5:30

शुक्रवारी मानवी साखळीव्दारे ‘क्लायमेट स्ट्राईक’ मध्ये सहभागी

'Greta Thunberg' hands the handsome young man! | ‘ग्रेटा थनबर्ग’च्या हातात आव्हाणेकर तरुणाईचा हात !

‘ग्रेटा थनबर्ग’च्या हातात आव्हाणेकर तरुणाईचा हात !

Next

अजय पाटील
जळगाव : हवामान बदलाच्या प्रश्नावर जगभरातील शासनाचे लक्ष वेधणाऱ्या व पर्यावरण बचावसाठी पुढे सरसावलेल्या ग्रेटा थनबर्गच्या समर्थनासाठी आता तालुक्यातील आव्हाणे येथील शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरणार आहेत. ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ अंतर्गत आव्हाणे परिसरातील चार शाळांचे विद्यार्थी शुक्रवारी सकाळी ९ वाजता आव्हाणे फाट्यावर मानवी साखळी करणार आहेत.
स्विडनची १६ वर्षीय ग्रेटा थनबर्ग या विद्यार्थिनीने सुरु केलेल्या आंदोलनाला नवी दिशा प्राप्त झाली असून, जगभरातील शहरांमध्ये तिच्या समर्थनासाठी नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. पहिल्यांदाच ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थी देखील आता ग्रेटाच्या समर्थनासाठी पर्यावरण बचावचा संदेश देणार आहेत. आव्हाणे येथील वंदे मातरम युवा संघटना, आव्हाणे फर्स्ट, आमदार ग्रृप, मोरया व रामराज्य गृ्रपतर्फे हा उपक्रम राबविला जात असून, यामध्ये जिल्हा परिषदेच्या कन्या व मुलांची शाळा, आचार्य गुरूकुल, शानुबाई पुंडलीक चौधरी हायस्कूल, जि.प. उर्दु शाळा व आॅक्सफर्ड इंटरनॅशनल स्कुलचे विद्यार्थी व विद्यार्थिनी देखील सहभागी होणार आहेत. याच उपक्रमास खेडी, वडनगरी व फुपनगरी येथील शाळांना देखील सहभागी करून घेण्याचे नियोजन आखले जात असून, २ हजार विद्यार्थी व ग्रामस्थ या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
सोशल मिडियावरील व्हिडीओवरून मिळाली प्रेरणा
ग्रेटा थनबर्गने सुरु केलेल्या ‘क्लायमेट स्ट्राईक’ मोहीमेला सोशल मीडियाव्दारे जबरदस्त प्रसिध्दी मिळत आहे. सोशल मिडियावरील व्हिडीओ पाहिल्यानंतर आव्हाण्यातील विशाल चौधरी, विजय पाटील, राकेश चौधरी, मयुर पाटील, जयेश पाटील, प्रशांत चौधरी, नवल पवार, स्वप्निल जोशी, सनी चौधरी, राहुल पाटील, धनंजय पाटील या युवकांनी बैठक घेत ग्रेटाला समर्थन देत गावातील समस्यांबाबत देखील त्यांनी प्रश्न मांडता यावा यासाठी ही मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला. ही मोहीम केवळ एका दिवसासाठी न ठेवता गिरणा नदीतील अवैध वाळू उपसा, सांडपाण्याची समस्या दुर होईपर्यंत आता ही मोहीम सुरु ठेवण्याचा निर्धार या युवकांनी घेतला आहे. तसेच परिसरातील नागरिकांना एकत्रित करण्याचे नियोजन सुरु आहे.
कोण आहे ग्रेटा थनबर्ग
ग्रेटा थनबर्ग या स्विडनमधील १६ वर्षीय विद्यार्थिनीने हवामान बदलावर अवघ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. २० आॅगस्ट २०१८ पासून तीने शुक्रवारी शाळेत न जाता स्विडनच्या संसदेसमोर आंदोलन सुुरु केले. अवघ्या वर्षभरात तिच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी जगभरातील नागरिक व संघटना पुढे येत असून, आता तिचे आंदोलन ‘क्लायमेट स्ट्राईक’ म्हणून प्रसिध्द होत असून, या स्ट्राईकमध्ये जगभरातील विद्यार्थी सहभागी होत आहेत. राज्यात मुंबई, पुणे, कोल्हापूर व औरंगाबादमध्ये देखील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. आव्हाणे येथे होणारा उपक्रम हा ग्रेटाच्या समर्थनार्थ ग्रामीण भागात होणारा पहिलाच उपक्रम मानला जात आहे.
ग्रेटाला समर्थनासह देणार ‘गिरणा बचाव’ची हाक
हा उपक्रम जरी ग्रेटाला समर्थन देण्यासाठी केला जात असला तरी या उपक्रमातून ‘गिरणा नदीचे’ होणारे गटारीकरण व बेसूमार वाळू उपस्यामुळे नदीचीहोणारी वाताहत याबाबत देखील चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून आवाज उठविला जाणार आहे. यासह पर्यावरण संदर्भातील इतर प्रश्नांबाबत देखील प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न विद्यार्र्थ्यांकडून होणार आहे. जळगाव शहरातील काही पर्यावरणवादी संघटनांनी देखील या उपक्रमाला पाठींबा दिला असून, अनेक पर्यावरणप्रेमी देखील या उपक्रमात सहभागी होणार आहेत. या शुक्रवारी हा उपक्रम आव्हाणे फाट्यावर करण्यात येणार असून, पुढील शुक्रवारी हाच उपक्रम कानळदा येथे करण्याचे नियोजन देखील आयोजकांकडून सुरु असून, गिरणा नदीलगतच्या गावांमध्येही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Web Title: 'Greta Thunberg' hands the handsome young man!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव