तक्रार निवारण सचिवांचीच तक्राऱ, चौकशी समिती नेमण्याची कुलगुरूंची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 01:21 PM2020-03-14T13:21:22+5:302020-03-14T13:22:15+5:30

व्यवस्थापन परिषदेत विद्यार्थ्यांनी घातलेल्या गोंधळाचा मुद्दा गाजला

Grievance redressal secretariat complaints, suggestion of the Vice Chancellor to appoint inquiry committee | तक्रार निवारण सचिवांचीच तक्राऱ, चौकशी समिती नेमण्याची कुलगुरूंची सूचना

तक्रार निवारण सचिवांचीच तक्राऱ, चौकशी समिती नेमण्याची कुलगुरूंची सूचना

googlenewsNext

जळगाव : विद्यापीठाच्या तक्रार निवारण समिती सचिवांच्या विरोधातच पुराव्यानिशी सिनेट सदस्यांनी कुलगुरूंसमोर अधिसभा बैठकीत तक्रारीचा पाढा वाचला़ त्याप्रसंगी सचिवांकडून तक्रारीच्या निकालामध्ये बदल केला जात असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर त्यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बैठकीत जोर धरू लागली होती़ या तक्रारींची दखल घेत कुलगुरूंनी लागलीच सचिवांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याची सूचना करत समितीच्या कार्यपध्दतीची मार्गदर्शिका बनविण्याचे आदेश केले़
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची अधिसभा बैठक सकाळी ११ वाजता कुलगुरू प्रा़ पी़पी़ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली़ याप्रसंगी व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा़ डॉ़ पी़पी़माहुलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा़ बी़व्ही़पवार यांची उपस्थिती होती़ तसेच सिनेट सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़ यावेळी सुरवातीला विविध अभिनंदनाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर सिनेट सदस्यांनी प्रश्नोत्तरांच्या सत्रात विविध विषयांवर चर्चा केली. त्यामध्ये युवारंग महोत्सवात काही अधिसभा सदस्यांची उपस्थिती असताना त्यांना व्यासपीठावर निमंत्रीत करण्यात आले नसल्याबाबत विष्णू भंगाळे यांच्यासह काही सिनेट सदस्यांनी नाराजी व्यक्ती केली़ व नियोजन समिती ही सर्वसामावेश असावी,असेही चर्चेप्रसंगी सांगण्यात आले़
सचिव करतातमुळ निकालात बदल
तक्रार निवारण समितीच्या सचिवांबाबत तक्रारींच्या संदर्भात बैठकीमध्ये प्रा़ डॉग़ौतम कुवर यांनी स्थगन प्रस्ताव मांडला़ त्यात त्यांनी तक्रार निवारण समिती सचिव हे मनमानी कारभार चालवित असून निकाल पत्रावर सर्वात आधी स्वत: च्या सह्या करतात़त्यानंतर अध्यक्षांच्या स्वाक्षरी घेतात़ हा प्रकार एवढ्यावरच नसून मुळ निकालात बदल करून ते स्वत:च्याच मर्जीचा निकाल तयार करतात, अशी तक्रार त्यांनी केली़ त्यावर एकनाथ नेहते यांनी अनुमोदन करून सचिवांवर कारवाई करून त्यांना निलंबित करावी, अशी मागणी केली़ त्याचबरोबर सचिव माहिती अधिरातील माहिती सुध्दा खोटी देत असल्याचा पुराव्या बैठकीत सदस्यांनी दाखविला़ त्यानंतर कुलगुरू यांनी सदस्यांच्या भावना समजून घेत सचिवांच्या विरोधात प्राप्त तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येईल, अशी माहिती दिली़ त्यानंतर तक्रार निवारण समितीच्या कार्यपध्दतीसाठी मार्गदर्शिका तयार करण्याच्याही त्यांनी सूचना केल्या़ त्यानंतर अधिसभेसाठी काही सिनेट सदस्यांनी विचारलेले प्रश्न वगळ्यात आल्यामुळे प्रा़ एकनाथ नेहते यांनी बैठकीमध्ये स्थगन प्रस्ताव मांडला़ व प्रश्न वगळ्यानंतर ते का वगळ्णात आले याचे कारण कळविण्यात येत असते़ मात्र, आम्हाला अद्यापही कारण कळविण्यात आलेले नसल्याचे सांगत नेहते यांनी नाराजी व्यक्त केली़
बैठकीमध्ये सतीष पाटील, दिलीप पाटील, नितीन ठाकूर,दिनेश खरात, मनीषा चौधरी, डॉ़ रत्नमाला बेंद्रे, नितीन बारी अ‍ॅड़ संदीप पाटील, डॉ़ अनिल पाटील, प्रा़ सुनील गोसावी, प्रा़ के़जीक़ोल्हे, प्रा़ संजय सोनवणे, राजेंद्र जाखडी, नितीन झाल्टे, राजेंद्र नन्नवरे, अमोल मराठे, गोपीचंद पाटील, एकनाथ नेहते यांच्यासह प्रा़ डॉ़ एल़पी़ देशमुख, अनिल लोहार, प्रा़ मोहन पावरा आदींची उपस्थिती होती़
निकषात नसताना नियुक्ती का?
दरम्यान, विद्यापीठाकडून नेमण्यात येणाऱ्या समित्यांमध्ये निकषात बसत नसताना प्राध्यपकांची नियुक्ती केली जाते़ त्यानंतर त्या समित्यांमध्ये बदल केला जातो, या विषयावर प्रा़ प्रकाश अहिरराव यांच्यासह विष्णू भंगाळे यांनी चर्चा केली़ त्यानंतर जुन्या कॉपीच्या आधारावर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येत आहे़ विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात असल्याच्या विषयावर विष्णू भंगाळे यांनी चांगलेच धारेवर धरले हाते़
विद्यार्थी गोंधळाचा व्यक्त केला निषेध
विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात वाढलेल्या तक्रारी व विद्यार्थी संघटनांकडून होणारे आरोप यावर सदस्यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत अचानक घुसून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी गोंधळ केला या घटनेचा सिनेट सदस्य नितीन ठाकूर यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला व या प्रकारामुळे सदस्यांचा अपमान झाला असल्याच्या भावना देखील व्यक्त केल्या. त्यावर सिनेट सदस्य विष्णू भंगाळे यांनी आजवर विद्यार्थ्यांनी अनेक आंदोलने केली आहे़ परंतू, बैठकीत घुसत गोंधळ घालण्याचा प्रकार कोणीही केला नाही. त्यामुळे कुलगुरूंनी असे प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी असे सांगितले. तसेच विद्यार्थी आहे म्हणून विद्यापीठ आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्यास प्राध्यान्य द्यावे जेणेकरून अशी वेळ पुन्हा येणार नाही. दरम्यान गोंधळ घालणारे विद्यार्थीच होते की गावगुंड होते. याचा तपास करावा अशी मागणी सिनेट सदस्यांनी केल्यानंतर विद्यार्थ्यांना गावगुंड हा शब्द वापरून नये अशी मागणी इतर सदस्यांनी केल्यानंतर व शब्द मागे घेण्यात आला. त्यावरून बैठकीत जोरदार चर्चा रंगून हा मुद्दा चांगलाच गाजला़
आंदोलनकर्त्यांची धास्ती; पोलिसांचा बंदोबस्त
गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थी संघटनांनी विविध मागण्या केल्यामुळे वातावरण तापले आहे. मागील महिन्यात व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत आंदोलनकर्त्यांनी आत जात घोषणा दिल्या होत्या. तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सकाळी सभा होताच कुलगुरूंच्या कारभाराविरुद्ध आंदोलन केल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिसभा सभेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त सभागृहाबाहेर लावण्यात आला होता. विद्यापीठ परिसरात पोलिसांची शुक्रवारी करडी नजर दिसून आली. यामुळे विद्यापीठाने विद्यार्थी आंदोलनाची धास्ती घेतली असल्याचे दिसून आले. तसेच अधिसभा सभागृहाच्या बाहेर सुध्दा पोलिसांसह विद्यापीठाचे कर्मचारी सभा संपेपर्यंत ठाण मांडून होते़

Web Title: Grievance redressal secretariat complaints, suggestion of the Vice Chancellor to appoint inquiry committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव