२५ दिव्यांग गरजू बालकांच्या कुटुंबाला किराणा भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:17 AM2021-05-11T04:17:09+5:302021-05-11T04:17:09+5:30
शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा जळगाव- रब्बी हंगामातील पिके काढून आता दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. मात्र ...
शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा
जळगाव- रब्बी हंगामातील पिके काढून आता दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. मात्र अद्यापही शासकीय खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी नोंदणी करून देखील आता दहा दिवस उलटले आहेत. मात्र शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने, शेतकऱ्यांकडून आता कमी भावात आपला माल व्यापाऱ्यांना विक्री केला जात आहे. तसेच शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्यास दरवर्षी होणारा उशीरमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
धूळपेरणीचे क्षेत्र घटणार
जळगाव - जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये धूळपेरणीच्या क्षेत्रामध्ये चांगलीच घट येत आहे. मान्सून ला होणारा विलंब व जून महिन्यात पावसाच्या सरासरीत होणारी घट यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता धूळपेरणीचा पर्याय सोडून दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.जिल्ह्यातील अमळनेर व धरणगाव या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धूळ पेरणी होत होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून धूळ पेरणी करणे शेतकरी पाडत आहेत. कृषी विभागाकडून देखील शेतकऱ्यांना धुळपेरणी न करण्याचे आवाहन केले जात आहे.