गुरूवारी होणार व्यावसायिक व समुदाय शिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 10:15 PM2019-11-11T22:15:24+5:302019-11-11T22:15:59+5:30
जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नंदूरबार येथील आदिवासी अकादमी अंतर्गत स्थापन होणाऱ्या व्यावसायिक व समुदाय शिक्षण ...
जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नंदूरबार येथील आदिवासी अकादमी अंतर्गत स्थापन होणाऱ्या व्यावसायिक व समुदाय शिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन गुरूवारी नंदूरबार येथे होणार आहे़
नंदूरबार येथे विद्यापीठाची आदिवासी अकादमी स्थापन झाली आहे. या अकादमी अंतर्गत सहा केंद्र स्थापन केले जाणार असून यातील व्यावसायिक व समुदाय शिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन होत आहे. गुरुवारी सकाळी ११.३० वाजता नंदूरबार येथील मौजे टोकर तलाव भागात हा भूमिपूजन सोहळा होत आहे. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांची उपस्थिती असणार आहे.
१०० विद्यार्थी क्षमतेची वर्ग खोली
इमारतीच्या तळमजल्यावर दोन वर्कशॉप, संगणक प्रयोगशाळा, समुदेशन कक्ष, प्रशासकीय कार्यालय असेल. पहिल्या मजल्यावर रोन वर्कशॉप, १०० विद्यार्थी क्षमतेची एक वर्ग खोली व ६० विद्यार्थी क्षमतेची एक वर्ग खोल असेल तर दुसºया मजल्यावर एक वर्कशॉप, वाचनालय, बैठक कक्ष, विभागप्रमुख कक्ष असेल. या इमारतीसाठी एकूण अंदाजित खर्च ५ कोटी असेल, अशी माहिती अकादमीचे संचालक प्रा.ए.बी.चौधरी यांनी दिली.