पाचोरा येथे शिवसेनेतर्फे सामूहिक विवाहसोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 06:33 PM2019-01-04T18:33:55+5:302019-01-04T18:35:11+5:30
पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळ असून, सर्वसामान्य जनता आर्थिक दृष्ट्या हतबल झाली असताना उपवर मुलामुलींचे लग्न कसे करावे या विवंचनेत आईवडील असताना पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील यांनी मतदारसंघातील आम जनतेसाठी शिवसेनेतर्फे १० मार्च रोजी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे.
पाचोरा, जि.जळगाव : पाचोरा व भडगाव तालुक्यात दुष्काळ असून, सर्वसामान्य जनता आर्थिक दृष्ट्या हतबल झाली असताना उपवर मुलामुलींचे लग्न कसे करावे या विवंचनेत आईवडील असताना पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील यांनी मतदारसंघातील आम जनतेसाठी शिवसेनेतर्फे १० मार्च रोजी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे.
बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना अंमलात आणल्याचे आमदार पाटील यांनी शिवतीर्थ ह्या शिवसेना कार्यालयात पत्रकारांशी वातार्लाप करताना सांगितले.
पाचोरा-भडगाव मतदारसंघातील रहिवाशी पालकांनी आपले वधू-वर यांची माहिती भरून पाचोरा व भडगाव येथे शिवसेना कार्यालयात योग्य माहिती सादर करून नावनोंदणी करावी. नोंदणी फॉर्म भरण्यास सुरवात झाली असून, अंतिम मुदत १० फेब्रुवारी आहे. तोपर्यंत ज्यांचे विवाह जुळतील त्यांनी सहभाग घ्यावयाचा आहे. हा विवाहसोहळा पाचोरा येथे भडगाव रोडवरील बाळासाहेब ठाकरे मैदानावर १० मार्च रोजी विविध जाती धर्मपंथांच्या चालीरीतीप्रमाणे योग्यवेळी एकाच ठिकाणी होणार आहे. यासाठी लागणारा संपूर्ण खर्च जेवणावळ, मंडप, वाद्य, स्टेज, रोषणाई आदी शिवसेना करणार आहे.
या विवाहसोहळ्यासाठी वधूवरांकडील आवश्यक तेवढे पाहुणे मंडळी आणण्यास हरकत नाही. या विवाह सोहळ्यात आमदार पाटील यांच्याकडून वधुवरांचे कपडे, मंगळसूत्र, जोडवे व सजावट फुलहार, खर्च केला जाणार आहे.