गोतावळा अर्थात कॅरिकेचर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 02:23 PM2018-08-25T14:23:52+5:302018-08-25T14:24:13+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात रवींद्र मोराणकर हे ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांच्या ‘गोतावळा’ या पुस्तकाविषयी लिहिताहेत...

Grover | गोतावळा अर्थात कॅरिकेचर

गोतावळा अर्थात कॅरिकेचर

Next


जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी ‘गोतावळा’ हे पुस्तक लिहिले आहे. बहुतांश मान्यवरांचे लेख हे त्यांच्या वाढदिवशी अभीष्टचिंतन करताना शुभेच्छा देण्यासाठी लिहिले आहेत. जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भवरलाल जैन यांनी या पुस्तकाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. वाढदिवस का आणि कसा साजरा करावा याचे विस्तृत विवेचन त्यात त्यांनी केले आहे. या पुस्तकात लेखक तिवारी यांनी मित्र परिवारातील मान्यवरांविषयी संयमित आणि नेमकेपणाने लेखन केले आहे. यातील लेख हे परिचयात्मक नाहीत, पण व्यक्तींची गुणवैशिष्ट्ये टिपणारी आहेत. त्याला शब्दांचे कॅरिकेचर म्हणजे अर्कचित्र म्हटले आहे. प्रत्येक मान्यवराविषयी वाचन करताना तसा अनुभव येतो. व्यक्तींचे चित्रही डोळ्यासमोर उभे राहते. त्यात पद्मश्री डॉ.भवरलालजी जैन, कविवर्य ना.धों.महानोर, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, नीलिमा मिश्रा, शीतल महाजन, कुलगुरू पी.पी.पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, मंत्री गिरीश महाजन, रतनलाल सी.बाफना, केशवलाल तिवारी, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, खासदार रक्षा खडसे, यजुर्वेंद्र महाजन, गिरीश कुलकर्णी, प्रदीप रस्से, सुशील नवाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्यक्तीचित्रे दिलीप तिवारी यांनी शब्दबद्ध केली आहेत.
लेखक : दिलीप केशवलाल तिवारी,
प्रकाशक : प्रशांत पब्लिकेशन्स, पृष्ठे : १८८, मूल्य : २०० रुपये

Web Title: Grover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.