वाढती हिंमत, लॉकडाऊनमध्येही अवैध मद्याचा पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 12:38 PM2020-07-13T12:38:35+5:302020-07-13T12:45:39+5:30
जळगाव : लॉकडाऊन असताना हनुमान नगर येथे बेकायदेशीर देशी दारुची विक्री करणाऱ्या अर्जुन पोपटराव आहेर (३५, रा. हनुमान नगर, ...
जळगाव : लॉकडाऊन असताना हनुमान नगर येथे बेकायदेशीर देशी दारुची विक्री करणाऱ्या अर्जुन पोपटराव आहेर (३५, रा. हनुमान नगर, मू. रा. पिंपळगाव, जि. नाशिक) या दुकानाच्या व्यवस्थापकाला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्याच्या ताब्यातील १७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
लॉकडाऊन असतानाही अवैधपणे मद्यविक्री सुरुच असून यावर पोलिसांची करडी नजर आहे. अशी विक्री सुरु असल्याचे कळताच पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित आरोपी अर्जुन आहेर हनुमान नगरात हा भाडेकरु म्हणून राहतो.
तो कालिंकामाता मंदीरासमोर डी. एस. साळुंखे यांच्या देशी दारुच्या दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करतो. लॉकडाऊन काळात त्याने दुकानातून सुमारे १७ हजार ४७२रुपए किंमतीचे देशी दारु विकत घेतली. घराजवळच जिन्याच्या आडोशाला बेकायदेशीर व विनापरवाना देशी दारुची विक्री करीत असताना त्याला पोलिसांनी पकडले.
सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, असीम तडवी, सचिन पाटील, निलेश पाटील यांनी करवाई केली. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी मद्य विक्री व लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास एमआयडीसी पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहेत.