वाढणारा लॉकडाऊन व्यावसायिकांची चिंता वाढवतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 03:35 PM2020-04-13T15:35:51+5:302020-04-13T15:36:58+5:30

२१ दिवसांपासून दुकान बंद ठेवून घरी बसलेल्या छोट्या व्यावसायिकांची चिंता वाढविणारा आहे.

The growing lockdown is raising concerns for professionals | वाढणारा लॉकडाऊन व्यावसायिकांची चिंता वाढवतोय

वाढणारा लॉकडाऊन व्यावसायिकांची चिंता वाढवतोय

Next
ठळक मुद्दे२१ दिवसांपासून दुकान बंद ठेवून घरी बसलेल्या छोट्या व्यावसायिकांचे हालघरात बसून राहा हे म्हणणे सोपे, पण चिमूटभर पोटाचे काय?

मोहन सारस्वत/लियाकत सय्यद
जामनेर, जि.जळगाव : एप्रिल अखेरपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा राज्य सरकारचा निर्णय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असला तरी गेल्या २१ दिवसांपासून दुकान बंद ठेवून घरी बसलेल्या छोट्या व्यावसायिकांची चिंता वाढविणारा आहे.
जामनेर शहरात सुमारे पाचशेहून जास्त टपरीधारक तर तेवढेच हातगाडीवर वस्तुंची विक्री करणारे आहेत. यात हातगाडीवर खाद्य पदार्थांची विक्री करणारे सर्वाधिक आहे. टपरीधारकात सलून व्यावसायिकांची सुमारे १२० दुकाने असून, लॉकडाऊनमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालय बंद असल्याने नागरिकांची महत्वाची कामे खोळंबली आहे. शेतकरी आपला उत्पादीत माल बाजारपेठेत विक्रीसाठी आणू शकत नाही. भाजी उत्पादक शेतकर्यांची यात मोठी कुचंबना दिसून येत आहे. ग्रामीण भागातील कलिंगड व पपई उत्पादक शेतकरी खासगी वाहनातून शहरातील विवीध भागात कलिंगड व पपईची विक्री करताना दिसत आहे.
लॉकडाऊन वाढणार हे निश्चित असले तरी या कालावधीत व्यावसायिकांना काही ठरावीक कालावधीसाठी दुकान उघडी ठेवण्याची सवलत दिली जावी, अशी मागणी होत आहे. हे करीत असताना ग्राहकांची गर्दी होऊ नये यासाठी निर्बंध आवश्यक आहे.
घरात बसून राहा हे म्हणणे सोपे, पण...
दरम्यान, लॉकडाऊनमुळे मजुरांना रोजगार मिळत नसल्याने शहराजवळील खेड्यातून मिळेल ते काम करण्यासाठी येताना दिसत आहे. घरात बसून राहा हे म्हणणे सोपे असले तरी ज्यांचे पोट रोजच्या कमाईवर चालते त्यांना चूल पेटविण्यासाठी घरात बसून कसे चालेल. यासाठी मिळेल ते काम करुन काहीतरी मिळविण्याची धडपड दिसून येत आहे.

Web Title: The growing lockdown is raising concerns for professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.