केळी भावात तेजी कायम, रावेर येथे वाढ
By admin | Published: January 28, 2017 12:42 AM2017-01-28T00:42:10+5:302017-01-28T00:42:10+5:30
10 दिवसात भावात 16 रुपयांनी वाढ झाली. विशेष अशा तेजीत रावेर येथे फरकात चार रुपयांनी घसरण झाली.
साकळी,ता.यावल : काळ बदलायला वेळ लागत नाही या उक्तीप्रमाणे आजच्या स्थितीत केळीचा काळ बदलला आहे आणि म्हणून काही महिन्यांपूर्वी केळी कोणी घेईना, केळीची झाली होती दैना अशी स्थिती झाली होती. मात्र आज काळ केळीचा आल्याने केळी घ्या केळी अशी वेळ आली आहे. त्यात ही उच्च प्रतीची दज्रेदार केळी तर जास्त भाव खात आहे. तेजीत मात्र रावेरला भाव कासव गतीने वाढत आहे.
10 दिवसात भावात 16 रुपयांनी वाढ झाली. विशेष अशा तेजीत रावेर येथे फरकात चार रुपयांनी घसरण झाली. 18 तारखेला भाव 1110 फरक 26 असे वाढले.स्थिर झाले मात्र फरकात चार रुपयांनी घसरण झाली. 24 साठी 20 रुपयांनी आणि 27 ला 20 रुपयांनी वाढ झाली खरी मात्र फरकात वाढ झाली नाही. फरक 22 वर कायम आहे. रावेर येथे नवती केळी, पिलबाग व कांदेबाग भाव 1150 रुपये फरक 22 म्हणजे उच्च केळीचे भाव 1282 रुपये असे वाढले. रावेर येथे जुनारी 910 रुपये फरक 20 असे वाढले म्हणजे नवती पिलबाग व कांदेबाग 10 दिवसात फक्त 16 रुपयांनी भाववाढ झाली.
जळगाव, चोपडा येथे फरक 22 वर कायम राहून भावात वाढ झाली. जळगाव येथे कांदेबाग 1131 रुपये फरक 22 असे म्हणजे उच्च कांदेबागाचे भाव हे 1263 रुपये झाले तर आखूड मीडियम केळीचे भाव 1031 रुपये फरक नाही असे वाढले. चोपडा येथे कांदेबाग 1121 रुपये क्विंटल फरक 22 म्हणजे उच्च कांदेबागाचे भाव 1253 रुपये असे झाले.
(वार्ताहर)